शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:46 IST

कोल्हापूर : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कदमवाडी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. ...

कोल्हापूर : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कदमवाडी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. महेश मारुती खाडे (वय २४, मूळ रा. मुसळवाडी, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे.खाडे याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते. तो दोन खासगी ठिकाणी नोकरी करीत होता. तेथून त्याला कमी केल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता.याबाबत अधिक माहिती अशी, मारुती खाडे व त्यांचे कुटुंबीय मूळचे मुसळेवाडी गावचे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते कदमवाडी येथे भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा महेश हा उच्चशिक्षित होता. त्याचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असल्याने परिसरातील लोक त्याचे कौतुक करायचे. चांगली नोकरी मिळत नसल्याने तो काही दिवस शहरातील एका औषध दुकानात काम करीत होता. तेथून कामावरून कमी केल्यानंतर तो एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. चार महिने काम केल्यानंतर तेथूनही त्याला कमी करण्यात आले. काम नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तो घरीच होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात.महेश रविवारी सकाळी वडिलांना सोडण्यासाठी दुचाकीवरून रेल्वे स्थानक येथे गेला. तेथून घरी आल्यानंतर त्याने आई बाहेर गेल्याचे पाहून नायलॉनच्या दोरीने छताच्या हुकास गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांची आरडाओरड ऐकून गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत वर्दी दिली. सीपीआर रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.आईची काळजी घ्याकामावर जाण्यासाठी वडिलांनी महेशला दुचाकीवरून रेल्वेस्थानकावर सोडण्यास सांगितले. घरातून बाहेर पडताना त्याने वडिलांना मिठी मारली. अश्रू ढाळत ‘बाबा, आईची काळजी घ्या’ असे सांगितले. त्याच्या या बोलण्याचे वडिलांना आश्चर्य वाटले. ‘इतका हळवा होऊ नकोस,’ असे म्हणून त्यांनी त्याची समजूत काढली. दोघेही दुचाकीवरून रेल्वेस्थानकावर आले. तो वडिलांना सोडून घरी आला. त्यानंतर काही वेळातच महेशने आत्महत्या केल्याचा निरोप वडिलांना मिळाल्यानंतर जोराचा मानसिक धक्का बसला