शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 12:56 IST

इचलकरंजी, दि. १२ : इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे विनायक माने (वय 35) या खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्या असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच ...

ठळक मुद्देआर्थिक देवघेवीतून खून धारदार शस्त्राने खूनविनायक माने खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये मृतदेह

इचलकरंजी, दि. १२ : इचलकरंजीजवळील कोंडीग्रे येथे विनायक माने (वय 35) या खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्या असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.

कोंडीग्रे गावातील रस्त्याकडेच्या चरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हा मृतदेह खोतवाडी येथील युवकाचा असल्याचे समजले. विनायक माने असे या मृत व्यक्तीचे नाव असून माने हे खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच आहेत.

खोतवाडी गावामध्ये ही माहिती समजताच माने यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाले. विनायक माने हे रात्री उशिरा मित्रांसमवेत खोतवाडीजवळच्या कोल्हापूर धाब्यावर जेवण करीत होते. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे फोनवरुन त्यांच्या आईशीही बोलणे झाले होते. आर्थिक देवघेवीतून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे. सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय कदम अधिक तपास करीत आहेत.