मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील उखळू गावच्या हदीतील ओढयाच्या पाण्यातुन खुदबुददीन बाबासाहेब फकीर वय ३५ रा बागणी ता वाळवा जि सांगली हा वाहून गेलयाची घटना घडली आहे याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे पोलीसातुन मिळालेली माहिती अशी बागणी येथील खुद बुद्दीन बाबासाहेब फकीर मेहबुब बाबासाहेब फकीर वय ३३ दिलीप सदाशिव नगारे वय ३५ राजेंद्र बाबुराव शेळके वय ५० प्रदीप रघुनाथ माळी वय ३० अमोल अशोक माळी वय 2७ रा सर्व बागणी ता वाळवा जि सांगली हे सहा मित्र पावसाळी पर्यटनासाठी शाहूवाडी येथील उखळू गावापासुन पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हातारकडा धबधब्या ज वळ गेले होते . पावसाचा जोर असल्याने ओढयाला पाणी आले होते . दुपारी १2 ३० वाजता खुद बुददीन ओढयाच्या पाण्यात उतरला पाण्याचा अदांज .न आलयाने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला त्याला वाचा विण्यासाठी .. मेहबुबु बाबासाहेब फकीर वय ३३ व दिलीप सदाशिव नगारे वय ३५ हे दोघे जन पाण्यात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने खुद बुद्दीन फकीर वाहून गेला यामध्ये मेहबुब फकीर व दिलीप नगारे जखमी झाले ही घटना उखळू गावात समजताच नागरीकांनी घटनास्थळी धाव पेतली सदर घटनेची माहिती शाहूवाडी पोलीसांना दिली पोलीसांनी तातडोने जखमी मेहबुब फकीर व दिलीप नगारे यांना कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले ओढयाच्या पाण्यात वाहून गेलेल्या खुदबुददीन फकीर याचा शोध ग्रामस्थ व पोलीस घेत आहेत पर्यटन स्थळ निर्जन ठिकाणी असल्याने व अंधार पडलयाने शोध मोहीम थांबावेण्यात आली . शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनेल गाडे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ पोलीस कॉन्टेबल श्री मोळके यांनी घटनास्थळी तातडीने जावून तपास केला उद्या सकाळी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे धबधब्याकडे जाण्यास गावकऱ्यांचा विरोध सहा युवक उखळू गावाजवळील धबधब्याकडे जात असताना उखळू गावातील नागरीकांना त्यांना जाण्यास विरोध केला होता कारण सदर धबधबा निर्जनस्थळी असल्याने तिकडे कोण जात नाही असे . त्यांना सागेतले होते मात्र सदर युवक गावकऱ्याचा विरोध डावलून निघुन गेले
ओढ्याच्या पाण्यातून युवक गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:50 IST