शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी युवकांनी संघर्ष कायम ठेवावा

By admin | Updated: February 28, 2016 00:37 IST

विश्वजित कुमार : ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ परिषद

कोल्हापूर : देशात मागासांना मिळणारे आरक्षण हटविण्याची भाषा सरकारकडून सुरू आहे; त्यामुळे संविधान व मूलभूत अधिकार अडचणीत येत आहेत. सद्य:परिस्थितीत निर्माण झालेल्या झुंडशाहीतून लोकशाही वाचविण्यासाठी युवकांकडे मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी मशालींनी मशाली पेटवून युवकांनी संघर्ष तेवत ठेवावा, असे आवाहन ‘एआयएसएफ’चे राष्ट्रीय सचिव विश्वजित कुमार यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, विद्रोही संघटना, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, युनायटेड बी स्टँड, पुरोगामी युवक व विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ ही परिषद झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून कुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर होत्या. विश्वजित कुमार म्हणाले, गोविंद पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाप्रमाणेच दिल्लीतील संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. संविधानाची शपथ घेऊन आलेले हे सरकार सध्या जातिपातीचे राजकारण करीत आहे. ‘जेएनयू’च्या प्रतिष्ठेला बाधा आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात उठलेल्या संघर्षाचा आवाज तीव्र होत आहे. ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले असतानाही सरकारच्या आदेशावरून राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारही केलेला नाही. सरकारच्या या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने लढण्याची गरज आहे. यावेळी पंकज चव्हाण, गिरीश फोंडे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी अनिल चव्हाण, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)