शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

भांडवलदारांविरोधात तरुणांनी एकत्र याव

By admin | Updated: February 10, 2015 23:55 IST

बाबूराव गुरव : सडोली खालसा येथे व्याख्याने

सडोली खालसा : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असणारी लोकशाही राजकीय नेत्यांनी जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, व्यापारीकरण अशी धोरणे अमलात आणून भांडवलदारांच्या घशात घातली. त्यामुळेच देशातील शेतकरी देशोधडीला लागला व आत्महत्या करू लागला. त्यामुळे शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी व भांडवलदारांच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी तरुणांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले. ते सडोली खालसा (ता. करवीर) येथील कै. दिनकरराव व शामराव पाटील बंधू शैक्षणिक, कला, क्रीडा संस्थेमार्फत घेतलेल्या ‘लोकशाही व निवडणुकीचे सध्याचे स्वरूप’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपती पाटील होते. माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, समाजासाठी रात्रीचा दिवस करणारे कार्यकर्ते तयार करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. भोगावती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी केरबा पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, अशोकराव पाटील, विश्वास खरुटे, अरुण सोनाळकर, पिंटू सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, रघुनाथ पाटील, उदयसिंह पाटील, दिनकर कांबळे, डी. पी. कांबळे, समरसिंह पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)५१ हजारांची मदतआपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणारे जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे त्यांना माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.