शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सातवे येथील युवकाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST

रविवार (दि. ६) रात्री ११ च्या दरम्यान आमतेवाडीहून गावाकडे येताना सातवे-बच्चे सावर्डे रस्त्यावर मोरया गॅरेजसमोर रस्त्यावरच्या खडीमुळे मोटारसायकल ...

रविवार (दि. ६) रात्री ११ च्या दरम्यान आमतेवाडीहून गावाकडे येताना सातवे-बच्चे सावर्डे रस्त्यावर मोरया गॅरेजसमोर रस्त्यावरच्या खडीमुळे मोटारसायकल घसरून पडली. रस्त्यावरील खडीवर डोके आपटल्यामुळे डोक्याला जबर दुखापत होऊन सुनील जागीच ठार झाला. अपघातात मोटारसायकलच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.

सुनीलच्या वडिलांचे निधन झाले असून, घरात तो एकुलता कर्ता पुरुष होता. त्याचे छोटे हार्डवेअरचे दुकान असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्याचे नुकतेच लग्न झाले असून त्याची अजून हळद सुकण्यापूर्वी घरापासून हाकेच्या अंतरावर त्याचा मृत्यू झाल्याने सातवेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. सोमवारी सकाळी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनीलच्या पश्चात दोन विवाहित बहिणी, आई व पत्नी आहेत. कोडोली पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून, सपोनि सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

रस्त्यावरील खडीने केला घात!

रस्त्यावरील खडी वाहनांच्या वर्दळीमुळे संपूर्ण रस्त्यावर विखरून पडली आहे. वर्षभरापासून पडलेल्या या खडीमुळे वारंवार दुचाकी वाहने स्लीप होण्याच्या घटना घडत असून या खडीने सुनीलचा घात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून बोलले जात होते.

फोटो: मृत सुनील पाटील(सातवे).