शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिकेवर

By admin | Updated: December 29, 2014 23:45 IST

१२ वास्तूंचा समावेश : पहिल्या आवृत्तीचे आज लोकार्पण

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती, न्यू पॅलेस, रंकाळ्यासह जुन्या कोल्हापूरच्या पारंपारिक पाऊलखुणा... या शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू. कोल्हापूरचे सौंदर्य ‘आपलं कोल्हापूर’ या दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत आहे. ही दिनदर्शिका जुन्या व ऐतिहासिक कोल्हापूरची स्मृती जागवत शाहूकालीन करवीरची सफर वाचकांना घडविणार आहे. परमाळे ग्रुप व ब्रँडशेफ अ‍ॅडव्हर्टायझिंग यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या अनोख्या ‘आपलं कोल्हापूर’ या प्रथम आवृती दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा उद्या, मंगळवारी होत आहे. हॉटेल केट्रीमध्ये सायंकाळी पाच वाजता श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांवर आधारलेल्या या दिनदर्शिकेमुळे नावीन्यपूर्ण आणि कलात्मक शहराची परंपरा अधोरेखित होण्यास मदत होईल.आपल्यासाठी दिवस आणि तारखेसह त्या दिवसाची वैशिष्ट्ये, सण-वार उत्सव, यात्रा, पंचांगापासून ते खाद्यपदार्थ अशा माहितीचा खजिना असलेल्या दिनदर्शिकेला व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धावपळीच्या या युगात दिवसातून किमान एकदा तरी त्यावरून नजर फिरवावीच लागते. अलीकडे खास विषयाला वाहिलेल्या उदाहरणार्थ आदर्श गृहिणी होण्यासाठीच्या टिप्स, पाककला, पंचांग, वास्तुशास्त्र यावर आधारित दिनदर्शिकाही काढल्या जातात, पण कोल्हापुरातील वैशिष्ट्यांवर आधारित दिनदर्शिका पहिल्यांदाच काढली जात आहे. अशाप्रकारचा हा अभिनव उपक्रम म्हणावा लागेल.या दिनदर्शिकेत कोल्हापूर शहरातील प्रमुख बारा वास्तूंची छायाचित्रे आणि त्यांची माहिती देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर राजर्षी शाहू महाराजांचे आकर्षक छायाचित्र आहे. शहरातील प्रमुख वास्तूंबरोबरच जुन्या संस्थान काळातील कोल्हापूरच्या खाणाखुणाही त्यात उमटतात. संस्थानकाळात परस्थ पाहुण्यांचे शहरात होणारे शाही स्वागत, प्रसिद्ध साठमारी, बग्गीतून सवारी, पूर्वीचे संस्थानकालीन रेल्वे स्टेशन, भवानी मंडप, शालिनी पॅलेस नसतानाचा रंकाळा अशा काही विस्मृतीत गेलेले गतचित्रे वाचकांना या दिनदर्शिकेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या दिनदर्शिकेमुळे कोल्हापूरकरांना या शहराची वैशिष्ट्ये नव्याने माहीत होणार आहेत, शिवाय पर्यटनवृद्धीसाठीही त्याचा उपयोग होणार आहे. ( प्रतिनिधी )कोल्हापुरातील प्रत्येक वास्तू आपल्याला एक इतिहास सांगते. मला पूर्वीपासूनच इतिहासाचा धांडोळा आणि जुन्या वास्तूंचा अभ्यास करण्याचा छंद आहे. या आवडीतूनच ही दिनदर्शिका साकारली आहे. यापुढे दरवर्षी या विषयाला वाहिलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाईल.- अभिजित परमाळे