शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कास पठार रस्त्यावर दोनशे फूट दरीत कार कोसळून तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कास यवतेश्वर रस्त्यावरील गणेशखिंड घाटातून कार शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कास यवतेश्वर रस्त्यावरील गणेशखिंड घाटातून कार शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक २५ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक व युवती गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला.

कोमल बापूराव पाटील (वय २५, रा. बोरखळ ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे तर प्राजक्ता दिलीप साबळे (२४), अमर दीपक शिर्के (२४, दोघेही रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.

कास पठारावर शुक्रवारी दुपारी कोमल पाटील, प्राजक्ता साबळे आणि अमर शिर्के हे तिघे कारने फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर तिघेही कारने साताराकडे यायला निघाले. कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरात आल्यानंतर अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार घाटातून थेट दोनशे फूट दरीत कोसळली. घाटात कार कोसळत असतानाच कार चालवणारा अमर व पाठीमागे बसलेली प्राजक्ता कारमधून बाहेर फेकली गेली. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. मात्र, या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. बाहेर फेकला गेलेला अमर जखमी अवस्थेत दरीवर आला. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रेकर्सनाही पाचारण केले. ट्रेकर्सनी कोमल पाटील हिचा मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

हा अपघात झाला त्यावेळी कोमल पाटील ही चालकाशेजारी बसली होती. कार दरीत कोसळल्यानंतर पुढच्या काचेतून कोमल आणखी शंभर फूट खाली बाहेर फेकली गेली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

----------------------

नातेवाइकांचा आक्रोश...

कोमल पाटील हिचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच तिचे नातेवाईक व ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कोमलचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. हा आक्रोश मन हेलावणारा होता. या अपघातात जखमी झालेल्या प्राजक्ता साबळे आणि अमर शिर्के हे दोघेही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.