शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या प्रश्नांबाबत युवा आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा कोल्हापुरी बाणा कौतुकास्पद आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातील लोक राजकारणविरहित काम करताना पाहून आनंद ...

संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा कोल्हापुरी बाणा कौतुकास्पद आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातील लोक राजकारणविरहित काम करताना पाहून आनंद झाल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटील यांनी विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नांबाबत आमदार पवार यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले. आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन वृद्धी, आयटी पार्क विस्तार, रोजगार वाढविण्याचे प्रयत्न, विमानतळ विकास, नाईट लँडिंग, आदी विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ, केडीएमजीचे इंद्रजित नागेशकर, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, फोर्टी वनर्स क्लबचे अध्यक्ष उत्तम फराकटे, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव यांनी सहभाग घेतला. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, माजी गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, गौतम परमार, प्रदीप भारमल, राजू लिंग्रस, प्रकाशभाई मेहता, दीप संघवी, दुर्गेश लिंग्रस, राहुल देसाई, सचिन पाटील, अर्जुन माने, अशपाक आजरेकर, मानसिंग जाधव, विजय पाटील, अभिजित पाटील-बेनाडीकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

हा संवाद कौतुकास्पद

काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत आमचा संवाद घडविला. कोल्हापूरच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासासाठी युवा आमदार पक्षीय झूल बाजूला ठेवून करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया उत्तम फराकटे यांनी व्यक्त केली.

चौकट

रोहित पवार यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोल्हापुरातील पूरग्रस्तांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक आणि बारामती ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना मदत केली. त्यात सोलापुरी चादर, बिस्कीट पुडे, पाण्याच्या बॉटल, सॅनिटरी नॅपकिन्स, क्लोरीन पावडर, मॅगी नुडल्स, माचीस, मास्क यांचा समावेश आहे.

फोटो (२९०७२०२१-कोल-युवा आमदार संवाद) : कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी गुरुवारी संवाद साधला.

290721\29kol_5_29072021_5.jpg

फोटो (२९०७२०२१-कोल-युवा आमदार संवाद) :  कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी गुरूवारी संवाद साधला.