शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आवळीनजीक कारच्या धडकेत चिकुर्डेचा तरुण जागीच ठार

By admin | Updated: May 15, 2014 01:05 IST

देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील

देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील (वय ३३, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हे जागीच ठार झाले. हा अपघात आज, बुधवारी सकाळी झाला. घटनास्थळ व कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष पाटील हे चरण (ता. शाहूवाडी) येथे आपल्या मामाच्या लग्नानिमित्त गोंधळाचे जेवण जेवून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले. याचवेळी आवळी खिंडीजवळ आले असता समोरून येणार्‍या चारचाकी गाडीचे उजव्या बाजूचे दोन्ही टायर (पुढील व मागील) फुटून भरधाव वेगात असणार्‍या या गाडीची (एमएच ५० ए ४१३४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. चारचाकी गाडी दाऊद याकूब आंबेकरी (मु.पो. खोडशी, ता. कºहाड) यांच्या मालकीची असून, ते स्वत: गाडी चालवत होते. दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडी रस्त्यावर उलटली व डाव्या बाजूला थांबली. यामध्ये दाऊद आंबेकरी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. आंबेकरी हे इचलकरंजी येथून कुटुंबीयांसह विशाळगडकडे चालले होते. या अपघाताची माहिती सरपंच तानाजी मदने यांनी कोडोली पोलिसांना दिली. उपसरपंच अनिल पाटील यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. ड्यूटी संपवून शाहूवाडीकडे जाणारे कोडोली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संग्राम शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.