शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
2
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
3
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
4
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
5
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
6
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
7
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
8
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
9
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
10
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
11
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...
12
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
13
दगडूला लॉटरी लागली! प्रथमेश परबची बॉलिवूड सिनेमात वर्णी, साकारणार मुख्य भूमिका
14
'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?
15
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
16
कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 
17
बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 
18
"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट
19
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
20
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?

गडहिंग्लजच्या युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू

By admin | Updated: September 28, 2014 00:51 IST

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा

शिरोडा (गोवा) : गडहिंग्लज येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा शिरोडा येथील समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र चंद्रकांत डबडे (वय १८, रा. कडगाव, गडहिंग्लज) असे या युवकाचे नाव आहे. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गाची सहल आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे आली होती. या सहलीला नव्वद विद्यार्थ्यांसह पाच शिक्षक आले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर साडेतीन वाजता काही विद्यार्थी समुद्रात मौजमजेसाठी उतरले होते. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील राजेंद्र डबडे हा युवक समुद्रात गटांगळ्या खाऊ लागल्याने सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शिक्षकांसह अन्य विद्यार्थ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, तो बेशुद्धावस्थेत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती युवकाच्या घरी देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास शिरोडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)