शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य करायला पदाची गरज नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ - समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावं लागतं. सर्वसामान्य लोकांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगरूळ - समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावं लागतं. सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेली असावी लागते, असे प्रतिपादन देवराज नरके यांनी केले. सांगरूळ (ता. करवीर) येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगरूळ गावातील पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर होते.

यावेळी देवराज नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे महापूर दरवर्षी येणारच, त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्ही चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य व लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुमार कपडे म्हणाले माजी आमदार चंद्रदीप नरके हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत. मतदारसंघात मदत करीत असताना गट-तट बाजूला ठेवून ते सर्वसामान्य माणसात मिसळून काम करतात, ही त्यांची वेगळी ओळख असून, आता त्यांनी पदावर नसतानाही प्रत्येक गावातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा लावलेला सपाटा लक्षात घेता त्यांचे समाजाभिमुख काम आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णात खाडे, जनार्दन खाडे, प्रशांत नाळे, प्रशांत खाडे, आनंदा इंगळे, दत्तात्रय सुतार, सर्जेराव मगदूम, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग बीडकर यांच्यासह पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी

सांगरूळ येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करताना युवा नेते देवराज नरके, कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, उपसरपंच सुशांत नाळे कृष्णात खाडे आदी.

240821\20210824_103437.jpg

सांगरूळ येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करताना युवा नेते देवराज नरके कुंभी चे उपाध्यक्ष निवास वातकर उपसरपंच सुशांत नाळे कृष्णात खाडे आदी