सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या शेतकरी पॅनेलने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. बँकेतील २१ संचालकांच्या जागांपैकी १९ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. माण सोसायटीत काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार सदाशिव पोळ यांचा अवघ्या चार मतांनी पराभव करुन बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला. या एका पराभवामुळे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी’ने पाहिलेले दिग्विजयाचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. बँकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार २७0 मतदारांपैकी दोन हजार १५२ मतदारांनी मतदान केले होते. गुरुवारी सकाळी येथील भूविकास बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. सुरुवातीला मतदारसंघनिहाय सर्व मतपत्रिका वेगळ्या करण्यात आल्या, त्यानंतर मतमोजणी सुरु करण्यात आली. या मतमोजणीवेळी गुलाल व फटाके घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती. मतदान केंद्राबाहेर मोठा पोलीस फौजफाटाही लावण्यात आला होता.सुरुवातीला सोसायटी मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आले. बहुचर्चित माण सोसायटीचा निकाल सर्वप्रथम लागला. आमदार जयकुमार गोरे यांनी माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचा अवघ्या चार मतांनी पराभव करुन राष्ट्रवादीवर बाउंसर टाकला. कऱ्हाड सोसायटीतही काँगे्रसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी धनाजी पाटील यांना पराभूत केले. खंडाळा सोसायटी मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला बळ मिळाले. राष्ट्रवादीपुरस्कृत शेतकरी पॅनेलचे दत्तानाना ढमाळ यांनी बकाजीराव पाटील यांचा एकतर्फी पराभव केला. यानंतर राष्ट्रवादीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागत गेले. शेतकरी पॅनेलचे प्रमुख विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तुकाराम शिंदे यांचा दणदणीत पराभव केला. जावळी सोसायटीत शशिकांत शिंदे यांनी दीपक पवार यांना पराभवाची धूळ चारली. वाई सोसायटीत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन यांनी परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिनकर शिंदे यांचा धुव्वा उडविला. कृषी प्रक्रिया मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे दादाराजे खर्डेकर यांनी सर्वच मते मिळविली.नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश पाटील-वाठारकर यांच्याकडून अपक्ष प्रभाकर साबळे पराभूत झाले. महिला राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुरेखा पाटील व कांचन साळुंखे यांनी विजय नोंदविला. भटक्या जमातीतून राष्ट्रवादीच्या अर्जुन खाडे यांनी ‘परिवर्तन’चे अजय धायगुडे-पाटील यांचा पराभव केला. अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रकाश बडेकर यांनी बाळासाहेब शिरसट व सुरेश गायकवाड यांचा पराभव केला. इतर मागास मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रदीप विधाते यांनी ‘परिवर्तन’चे शिवाजी भोसले व अपक्ष राजेंद्र नेवसे यांचा पराभव केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा सोसायटी), राजेंद्र राजपुरे (महाबळेश्वर सोसायटी), विक्रमसिंह पाटणकर (पाटण सोसायटी), आ. प्रभाकर घार्गे (खटाव सोसायटी), माजी खा. लक्ष्मणराव पाटील (खरेदी-विक्री संघ), खा. उदयनराजे भोसले (गृहनिर्माण), अनिल देसाई (औद्योगिक विणकर व मजूर) हे राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध झाले होते. विरोधातील ७ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. अशा झाल्या लढती...४जावळी : आ. शशिकांत शिंदे - ४२ (विजयी) विरुद्ध दीपक पवार - ६. ४कऱ्हाड : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर - ८७ (विजयी) विरुद्ध धनंजय पाटील-५३. ४कोरेगाव : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने - ८३ (विजयी) विरुद्ध सुरेश गायकवाड -२.४माण : आ. जयकुमार गोरे - ३८ (विजयी) विरुद्ध माजी आ. सदाशिव पोळ -३४. ४खंडाळा : दत्तानाना ढमाळ - ३९ (विजयी) विरुद्ध बकाजीराव पाटील-१0. ४वाई : नितीन पाटील - ४९ (विजयी) विरुद्ध दिनकर (बापू) शिंदे-९. ४फलटण : रामराजे नाईक-निंबाळकर - १२१ (विजयी) विरुद्ध तुकाराम शिंदे -६. ४नागरी बँका व पतसंस्था : राजेश पाटील-वाठारकर - २७९ (विजयी) विरुद्ध प्रभाकर साबळे -१५७. ४कृषी प्रक्रिया : दादाराजे खर्डेकर - ३0 (विजयी) विरुद्ध कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील -0. ४इतर मागास प्रवर्ग : प्रदीप विधाते - १६५७ (विजयी) विरुद्ध शिवाजी भोसले -४0२४महिला राखीव (२ जागा) : सुरेखा पाटील - १७३५, कांचन साळुंखे - १५६५ (दोघीही विजयी) विरुद्ध सुनेत्रा शिंदे - २७४. ४अनुसूचित जाती-जमाती : प्रकाश बडेकर - १६६५(विजयी) विरुद्ध बाळासाहेब शिरसट -४१६. ४भटक्या जमाती : अर्जुन खाडे - १५६७ (विजयी) विरुद्ध अजय धायगुडे-पाटील -५४५उदयनराजेंनी बंद लखोटा आणावा : रामराजे‘बारामतीवरुन येणाऱ्या बंद लखोट्यातूनच खासदारकीचे निर्णय झालेत. उदयनराजेंकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, त्यांनीच लखोटा आणून द्यावा,’ असे शरसंधान रामराजेंनी केले.शिवेंद्रसिंहराजे चेअरमनपदी ?या निवडणुकीत सातारा, फलटण व वाई तालुक्यांचे वर्चस्व राहिले आहे. सातारा तालुक्याला चेअरमनपदाची संधी मिळालेली नाही. यातूनच शिवेंद्रसिंहराजेंना चेअरमन करण्याचा शब्द मतदानाआधी दिला होता. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडू शकते.राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने दहा वर्षांत केलेले काम पाहून पुन्हा एकदा मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. नवनिर्वाचित संचालकही निवडून आले आहेत. बँकेत राजकारण न आणता विरोधकांनीही बँकेची परंपरा अबाधित ठेवावी.- रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी शेतकरी पॅनेल प्रमुख
होय...‘डीसीसी’ राष्ट्रवादीचीच!
By admin | Updated: May 8, 2015 00:42 IST