शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘जी. डीं.’ची उद्या चौकशी

By admin | Updated: March 27, 2016 00:55 IST

लेखापालची कसून चौकशी : वारणा शिक्षक कॉलनी चोरी प्रकरण

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटींची चोरी व तेथे सापडलेले एक कोटी २९ लाखांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांना उद्या, सोमवारी पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावली आहे. वारणा शिक्षण मंडळाचे लेखापाल बी. बी. पाटील यांच्याकडे शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. सचिव पाटील यांच्या चौकशीमध्ये महत्त्वपूर्ण माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, आरोपी मैनुद्दीनचा फरार साथीदार रेहान अन्सारी हा बिहारमध्ये लपून बसला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाल्याचे समजते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने जबाबामध्ये शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, लिपिक विजय कुंभोजकर, लेखापाल बी. बी. पाटील यांच्यासह शिपायांची नावे घेतली. या सर्वांना गेल्या आठ वर्षांपासून आपण ओळखतो. त्यांच्यातील आर्थिक व्यवहारांची गोपनीय माहिती आपल्याला होती, असेही त्याने जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी लिपिक कुंभोजकर, लेखापाल पाटील यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांकडे यापूर्वी चौकशी करून जबाब घेतले. शनिवारी पुन्हा लेखापाल बी. बी. पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. सकाळी साडेदहापासून पाटील हे पोलिस मुख्यालयातील बाकड्यावर बसून होते. त्यांच्याकडे तीन कोटींबाबत चौकशी केली. या प्रकरणात सचिव जी. डी. पाटील यांची चौकशी अद्याप झालेली नाही. त्यांना चौकशीसाठी उद्या हजर राहण्यासाठी फर्मान काढले आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याने शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तीन कोटींचा मुक्काम कोडोली पोलिस ठाण्यात वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून आरोपी मैनुद्दीन मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा) याने चोरी केलेले तीन कोटी रुपये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने सांगली पोलिसांकडून ताब्यात घेतले. ही रक्कम कोडोली पोलिस ठाण्यामध्ये सशस्त्र पोलिस बंदोबस्तात ठेवली आहे. पन्हाळा न्यायालयास पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम बँकेत भरली जाणार आहे. (प्रतिनिधी)