कऱ्हाड : कर्नाटकात मराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत़ कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही़, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते़ ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो़ आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.
‘येळ्ळूर’प्रश्नी केंद्र शासनाकडे दाद मागणार
By admin | Updated: July 27, 2014 23:00 IST