शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पिवळाधमक ‘तोतापुरी’ बाजारात दाखल

By admin | Updated: April 9, 2017 16:30 IST

डाळींच्या दरात वाढ सुरूच : भाजीपालाही वधारला

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : यंदा हापूसबरोबर तोतापुरी आंब्यांची आवक थोडी लवकरच झाली असून, बाजारात पिवळाधमक तोतापुरी आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. डाळींच्या दरात दर आठवड्याला थोडी-थोडी वाढ होऊ लागली असून, तूरडाळ व हरभरा डाळींचे दर ऐंशीच्या वर गेले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दर काहीसे वधारले आहेत.

रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हापूसच्या दीड हजारांपेक्षा अधिक पेट्या, तर रोज बाजार समितीत आठ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्याशिवाय रायवळ व पायरी आंब्यांची आवकही सुरू आहे. घाऊक बाजारात हापूस पेटी (चार डझन) सरासरी १५००, तर बॉक्सचा (दोन डझन) दर ३०० रुपये असला तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढाच आहे. किरकोळ बाजारात दर ४०० रुपये डझन आहे. त्यामुळे अजून तरी हापूस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. पायरी व रायवळ आंब्यांची आवकही चांगली आहे. साधारणत: ३० पासून ६० रुपये किलोपर्यंत याचे दर आहेत.कलिंगडांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात काळ्या पाठीची कलिंंगडे २० रुपये, तर हिरव्या पट्ट्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. लिंबूंच्या मागणीत वाढ झाली तरी आवकही चांगली असल्याने १० रुपयांना पाच लिंबू असा दर आहे.

एरव्ही मे महिन्यात दाखल होणारा तोतापुरी आंबा यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आला आहे. पिवळ्याधमक तोतापुरीने ग्राहकांना भुरळ घातली आहे. पाणीटंचाई व कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी दर वाढण्यास सुरुवात झाली असून, ओला वाटाणा यंदा पहिल्यांदाच ६५ रुपयांपर्यंत धडकला आहे. भेंडी, दोडका, कारली, वरण्याचा दर ४० पासून ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. काकडीची आवक वाढल्याने दर ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे. चटणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी, तर मेथी, पालक पाच रुपये पेंढी आहे. वांगी २० रुपये किलो, तर टोमॅटो १० ते १५ रुपयांपर्यंत आहे

तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत आठवड्याला वाढ होत असून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.मसूरडाळ, मटकीचे दर मात्र स्थिर आहेत. सरकी तेल, साखरेच्या दरांत फारसा चढउतार झालेला नाही. लाल मिरचीची आवक यंदा चांगली असली तरी तिच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. ब्याडगीबरोबर घंटुर मिरचीला अधिक मागणी आहे. ज्वारीचे दर काहीसे स्थिर आहेत. किलोचा दर २२ ते ३० रुपये आहे. कांदा घसरला! कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत रोज २६ हजार पिशव्यांची आवक होत असून सरासरी दर प्रतिकिलो ५५ रुपये आहे. बटाट्याची आवक कमी असल्याने दरात थोडी वाढ झाली असली तरी लसणाचे दर मात्र स्थिर आहेत.