शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

५० वर्षात ‘गडहिंग्लज’चे २९ जवान शहीद !

By admin | Updated: January 12, 2015 00:43 IST

वीरांची भूमी : इंदिराजीनीही घेतली होती नोंद , विविध पुरस्कारांनी सन्मानित जवान

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज१९६५ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धापर्यंत आणि त्यानंतर वेळावेळी झालेल्या आतंकवादी हल्यांसह , कर्तव्य बजावताना झालेल्या दुर्घटना - अपघातात ‘गडहिंग्लज’च्या सुपूत्रांनी देशासाठी बलिदान दिले आहे. गेल्या ५० वर्षात तालुक्यातील तब्बल २९ जवान देशरक्षणाच्या सेवेत शहीद झाले आहेत. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी शोकसंदेश पाठवून येथील एका जवानाच्या हौतात्म्याची नोंद घेतली होती. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुत्नाळ येथील बिंदू नारायण कुलकर्णी या तरूणाने अवघ्या १७ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे कोल्हापूरातील भवानी मंडपानजीकचा चौक ‘बिंदू’ चौक नावाने ओळखला जातो, तर त्यांच्या जन्मगावी मुत्नाळमध्येही ‘बिंदू स्मारक’ उभारण्यात आले आहे.हुतात्मा ‘बिंदू’पासून सुरू झालेली हौतात्म्याची ही मालिका लिंगनूरच्या सुनिल जोशिलकर यांच्यापर्यंत येवून ठेपली आहे. देशसेवा बजावताना विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्कार प्राप्त जवानांचाही या शहीदांमध्ये समावेश आहे. त्यांच्या पराक्रमाने तरूणांना बळ मिळते. नूलच्या शिपाई बसाप्पा महार यांच्यापासून नेसरीच्या मेजर सत्यजीत शिंदे-नेसरीकर यांच्यापर्यंत २६ जवानांना लढाई व कारवाईत वीरमरण आले. सावतवाडीचे संतोष देसाई, जांभूळवाडीचे रवींद्र कांबळे आणि लिंगनूरचे सुनिल जोशिलकर यांना कर्तव्य बजावताना वीरगती मिळाली.