शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची वर्षपूर्ती अन कोल्हापूर...

By admin | Updated: October 26, 2015 00:09 IST

एलबीटी, जाचक परवाने रद्दचा दिलासा

अच्छे दिनच्या अपेक्षेने कोल्हापुरातील उद्योजक भाजप-शिवसेनेच्या पाठीशी राहिले. मात्र, सत्तेत येण्यापूर्वी उद्योजकांना वीज दरवाढ कमी करणे, पायाभूत सुविधांची पूर्तता करणे, आदींबाबत आश्वासनांच्या माध्यमातून दिलेला ‘शब्द,’ भाजप-सेना सरकारने वर्ष उलटले तरी, पाळलेला नाही. केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा दिला. ठोस असे काही झाले नसल्याने उद्योजकांत नाराजी आहे.या सरकारकडूनही उद्योजकांचा अपेक्षाभंग झाला. त्यांना केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा देण्याचा सरकारने प्रयत्न केला. पण, प्रमुख मागण्यांबाबत त्यांच्या पदरात केवळ आश्वासने पडली. स्थलांतरणाच्या निर्णयावर उद्योगांसाठी कर्नाटक सरकारने पायघड्या अंथरल्या आहेत. त्याची दखल घेत युती सरकारच्या पाठीशी राहिलेल्या उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी २९ डिसेंबर २०१४ रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना ‘सरकारवर विश्वास ठेवा, स्थलांतरणाचा विचार सोडा,’ असे आवाहन केले. त्यानंतर आता सरकारची वर्षपूर्ती झाली तरी, उद्योग क्षेत्राबाबत ठोस अशी काहीच कार्यवाही झालेली नाही. वाढीव वीज दरवाढ कमी व्हावी, भूखंड मिळावेत, टोल हटवावा, बी-टेन्युअरचा प्रश्न सोडवावा, ईएसआयसी रुग्णालय सुरू करावे, अशा मागण्यांच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत अजूनही उद्योजक आहेत.वीजदराबाबतचा ‘शब्द’ पाळला नाही; उद्योजकांत नाराजीअवघे चार आणे कमी केलेवीज दरवाढ कमी करण्यासाठी सरकार बदलल्यावरदेखील कोल्हापुरातील उद्योजकांनी आंदोलन केले. त्याचे पडसाद राज्यात उमटले. त्याची दखल घेऊन सरकारने युनिटमागे अवघे चार आणे कमी केले. इतर राज्यांप्रमाणे दर ठेवण्याची कार्यवाही सरकारकडून झाली नाही. उद्योजकांना दिलेला शब्द सरकारला पाळता आला नसल्याची प्रतिक्रिया उद्योजक उदय दुधाणे यांनी दिली. ते म्हणाले, एकीकडे वीजदर चार आण्यांनी कमी केला आणि दुसरीकडे एका अश्वशक्तीला मॅक्झिमम डिमांड चार्जेस (एमडीसी) ३० रुपयांनी वाढविला आहे. त्यामुळे दर कमी करणे केवळ नावापुरते झाले.