शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव मोहिते यांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: April 17, 2015 00:13 IST

इंद्रजित मोहिते : ‘कृष्णा’ दिवाळखोरीत निघाल्याने डोळे पाणावतात

इस्लामपूर : माझे वडील, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी कृष्णाकाठावरील जिरायती पिकावर जगणाऱ्या शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी सहकारी तत्त्वावर कृष्णा साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याची भरभराटही झाली. पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात राबविल्याने परिसर सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु आमच्या घराण्यातील युवा पिढीतील अहंपणा आमच्याच अंगलट आला आहे. सध्या कृष्णा कारखान्याची दिवाळखोरीकडे वाटचाल चालू आहे. हे पाहून माझे डोळे पाणावतात, अशी भावनिक प्रतिक्रिया कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. मोहिते यांनी रयत पॅनेलच्या माध्यमातून ‘कृष्णा’च्या आगामी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी गप्पा मारल्या. ते म्हणाले की, सध्या ‘कृष्णा’ची अवस्था बिकट आहे. हा कारखाना वाचवायचा असेल, तर सत्ताबदल गरजेचा आहे. आमच्या घराण्यात प्रत्येकाचा ‘इगो प्रॉब्लेम’ झाला आहे. मुळात मीच सत्ताधीश, अशी भावना झाल्याने आमची कारखान्यावरील सत्ता गेली. बाह्यशक्तींनी याचा फायदा उठवत आमच्यात मोठी दरी निर्माण केली आहे. सध्याची ‘कृष्णा’ची अवस्था पाहता, डोळ्यात पाणी येते. रात्रीची झोपही उडाली आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आगामी निवडणुकीत मदत करणार का? याबाबत विचारले असता डॉ. मोहिते यांनी होकारार्थी उत्तर दिले. मी स्वत: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर कायमस्वरूपी सदस्य असल्याने पवार यांच्याशी वरचेवर संपर्क असतो. माझी कामाची पध्दत पाहून पवार माझ्यावर खूश आहेत. आ. जयंत पाटील, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील, कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कुंडलचे अरुण लाड यांना लवकरच भेटून भूमिका स्पष्ट करणार आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)