शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सूत दरात १० ते १५ रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 00:04 IST

कापडास भाव नाही : यंत्रमागधारकांसह व्यापारी वर्ग हवालदिल

इचलकरंजी : कापड उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सुताच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यामुळे येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. आठवडाभरात विविध प्रकारच्या सूत दरात किलोला १० ते १५ रुपये इतकी वाढ झाली असून, त्या प्रमाणात कापडास भाव मिळत नसल्याने यंत्रमागधारक व व्यापारी हवालदिल झाले आहेत.वस्त्रोद्योगात असलेली आर्थिक मंदी आणि त्यापाठोपाठ आलेली नोटाबंदी यामुळे कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापारी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर कापडाच्या भावात थोडी वाढ होत असतानाच गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने सुताच्या दरामध्येसुद्धा वाढ होऊ लागली आहे. विशेषत: ६० वेफ्ट या प्रकाराच्या सुतामध्ये प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर ३०, ३४, ४०, ४२, ६४, ८०, १०० व १२० या सुतामध्येसुद्धा प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. सुतापासून उत्पादित कापडाच्या दरात मात्र प्रतिमीटर फक्त १ रुपये ५० पैसे ते १ रुपये ७५ पैसे इतकीच वाढ झाली आहे. परिणामी, यंत्रमागधारकांना नुकसान होत असल्याने सूत दरवाढीच्या विरोधात असंतोष पसरला आहे.सूत दरवाढीबाबत बोलताना इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी व यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कापडाचे भाव थोडे जरी वाढले तरी सूत व्यापारी व दलालांकडून त्याचा गैरफायदा घेत सुताचे दर वाढविले जात आहेत. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून सूत दरावर नियंत्रण आणले पाहिजे. ज्यामुळे यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापडास कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना अल्प नफा मिळावा, अशी तरतूद सरकारने करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)६० वेफ्ट या प्रकाराच्या सुतामध्ये प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर ३०, ३४, ४०, ४२, ६४, ८०, १०० व १२० या सुतामध्येसुद्धा प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.