जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. या जमिनी पुन्हा वापराखाली आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाने विविध योजना राबवल्या जात आहेत. परंतु त्या खर्चिक आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत सहकार्याची भूमिका घेत क्षारपड जमीन सुधारणा योजनेअंतर्गत मदतीचे धोरण जाहीर केले आहे. परंतु खासगी क्षेत्रातून ज्यांना क्षारपड जमिनीची सुधारणा करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांसाठी यड्राव बँक अकरा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २८व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ही सभा शनिवारी बँकेच्या जयसिंगपूर येथील शाखेच्या सभागृहात संपन्न झाली.
प्रारंभी संस्थापक सहकारमहर्षी शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वारगत संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप मगदूम यांनी केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी नोटिसीचे व विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केल्यानंतर त्यास सभासदांनी मंजुरी दिली.
यावेळी दादा पाटील-चिंचवाडकर, संजय नांदणे, राजेंद्र झेले, संचालक संजय पाटील-यड्रावकर, जिवंधर मुरचिट्टे, शरद मगदूम, प्रताप आगरे, सुरेंद्र मगदूम, धन्यकुमार पाटील, भरत चौगुले, विजया पाटील, बबिता बेळकुडे, मोहन प्रभावळकर, शंकर पुजारी, प्रा. आसलम फरास, के. डी. उपाध्ये यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव तर सचिन देशिंगे यांनी आभार मानले.
फोटो – 25092021-जेएवाय-02
फोटो ओळ – जयसिंगपूर येथे यड्राव बँकेच्या वार्षिक सभेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले.