शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ए. वाय. पाटील-विजयसिंह मोरे आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:01 IST

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. तसे राधानगरी तालुक्यातील गट क्रमांक १ मध्ये समाविष्ट असलेल्या ३२ गावांतील काही ग्रामपंचायतींबरोबर ‘बिद्री’चे राजकारण ढवळून निघाले आहे

ठळक मुद्दे अंतर्गत धुसफुसीमुळे पारंपरिक शत्रुत्वाला धार : काही ग्रामपंचायतींबरोबर ‘बिद्री’चे राजकारण ढवळणारपारंपरिक शत्रुत्व विसरून ‘बिद्री’च्या निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने ‘बिद्री’च्या सत्तेचा मार्ग मोकळा

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. तसे राधानगरी तालुक्यातील गट क्रमांक १ मध्ये समाविष्ट असलेल्या ३२ गावांतील काही ग्रामपंचायतींबरोबर ‘बिद्री’चे राजकारण ढवळून निघाले आहे. बिद्रीत गत पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे नेते ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून आहेत. त्यामुळेच गट क्रमांक १ मधील जिल्ह्यात नेतृत्व करणाºया नेत्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून असणार आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत के.डी.सी.सी.बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे तालुक्याचे नेते विजयसिंह मोरे यांनी आपले पारंपरिक शत्रुत्व विसरून ‘बिद्री’च्या निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने ‘बिद्री’च्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. आणि हे नेते सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी उत्पादक गट क्रमांक.१ मधून विजयी झालेले महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोरे यांना २१ हजार ७८५ मते, तर ए. वाय. पाटील यांना २१ हजार ६११ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधी असलेले राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार नंदकिशोर सूर्यवंशी यांना १५ हजार ९०१, तर विठ्ठलराव खोराटे यांना १५ हजार ८९६ अशी मते मिळाली. सुमारे सहा हजारांच्या फरकाने मोरे व पाटील विजयी झाले होते.दरम्यान, मोरे व पाटील यांचे मित्रत्व काही काळच टिकल.े अंतर्गत धुसफुसीमुळे पुन्हा यांच्यातील पारंपरिक शत्रुत्वाला धार चढत गेली. विधानसभा, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत यांच्यातील संघर्ष वाढतच गेला. दरम्यान, पाटील यांच्या पासून दूर गेलेले ‘बिद्री’चे माजी संचालक राजेंद्र पाटील यांचे सूत जुळले, तर जनता दलाचे नेते विठ्ठलराव खोराटे यांनी आपले अस्तित्व वेगळे ठेवले. सध्या या मतदारसंघात ए. वाय. पाटील यांच्या बरोबर राजेंद्र पाटील, भिकाजीराव एकल, फतेसिंग पाटील, आदी मंडळी, तर विजयसिंह मोरे यांच्याबरोबर नंदकिशोर सूर्यवंशी, रंगराव मगदूम सुभाष पाटील, राजेंद्र पाटील यापैकीच कोणी तरी साथीला असणार, अशी चर्चा आहे. तर जनता दलाचे खोराटे यांनी जि.प.च्या निवडणुकीपासून भाजपशी घरोबा वाढविला. या जि.प.च्या निवडणुकीत खोराटे यांनी भाजपशी सलगी वाढविल्याने त्यांची ‘बिद्री’च्या अशासकीय मंडळात वर्णी लागली.

या मतदारसंघात सध्या आकारात येत असलेल्या युतीनुसार भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख के. के. राजिगरे यांनी सवतासुभा मांडत समविचारी गटाशी हातमिळवणी केली आहे. राष्ट्रवादी, भाजप, जनता दल, काँग्रेस, शिवसेना, समविचारी घटक, आदी पक्ष, संघटना यांच्या युतीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच असणार असून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळेच २८ सप्टेंबरच्या माघारीच्या दिवशी इच्छुकांची मनधरणी करताना तारांबळ उडणार आहे. तर काहींचे अंतर्गत फुटीचे सुद्धा संकेत मिळत आहेत. तर कुणाशी युती होणार, नाराजी दूर करण्यात कोण यशस्वी होणार की नाराजी अन्य पारड्यात पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.‘बिद्री’च्या गट नंबर १ मधील प्रतिनिधी१९९० ते १९९५ : विजयसिंह कृ. मोरे, मसू रा. तोरस्कर, रंगराव धों. कोतमिरे, १९९५ ते २००० : विजयसिंह कृ. मोरे, नंदकिशोर बा. सूर्यवंशी, विजयमाला अ. चव्हाण. २००१ ते २००५ : विजयसिंह कृ. मोरे, नंदकिशोर बा. सूर्यवंशी, गीता के. चौगले. २००५ ते २०१० : विठ्ठलराव शि. खोराटे, आनंदराव य. पाटील, सविता भि. एकल, राजेंद्र पां. पाटील (संस्था गट). २०११ ते २०१५ : विजयसिंह कृ. मोरे, आनंदराव य. पाटील, सविता भि. एकल.१सध्या या मतदारसंघात संघात ३२ गावे असून, यामध्ये ४०० हून अधिक मतदान सरवडे १५८८, सोळांकुर ७४५, कासारपुतळे ६१९, नरतवडे ९१५ , पनोरी ४९०, पंडेवाडी ४२४ मालवे ४४३ या गावांत आहेत.२यापूर्र्वी जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघ या निवडणुकांचा परिणाम या ‘बिद्री’च्या रणांगणात जाणवणार आहे. त्याबाबतची यत्रंणा सतर्क होताना दिसून येत आहे.३यावेळी प्रथमच उत्पादक गट क्रमांक १ मधून तीन संचालकांची निवड होणार आहे. सध्या या गटामध्ये९ हजार ५४४ मतदार पात्र आहेत. तर बिद्रीच्या निवडणुकीसाठी ५७ हजार ८०९ इतके मतदार आपला हक्क बजावणार आहेत.४बिद्रीच्या निवडणुकी बरोबर ग्रामपंचायत निवडणुका काही प्रमुख गावांमध्ये सुरू असल्यामुळे तेथील बदलेली गटांची सद्य:स्थितीचा व सध्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींच्या सत्तेचा परिणाम दिसून येणार आहे.गट क्रमांक १ - मधील समाविष्ट गावे अशी- पनोरी, हेळेवाडी, बुजवडे, मल्लेवाडी, मोघर्डे, सोळांकूर, सुळंबी, नरतवडे, मांगेवाडी, पंडेवाडी, सावर्डे (पा.), कासारवाडा(पा.), कासारपुतळे, धामणवाडी, सरवडे, मालवे, राधानगरी, फेजिवडे, पडळी, सावर्धन, आटेगाव, ऐनी, फराळे, आडोली, चाफोडी, पाटपन्हाळा, काळम्मावाडी, वडाचीवाडी, दुबळेवाडी, सावर्दे, ढेंगेवाडी, बनाचीवाडी. या ३२ गावांत सभासद आहेत. तर वाडदे, भांडणे, नानिवळे व वाकी या चार गावांत एकही सभासद नाही.