शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘वाई फेस्टिव्हल’ उद्यापासून

By admin | Updated: December 12, 2014 23:43 IST

‘लोकमत’ माध्यम प्रायोजक : रोटरी क्लब, उत्कर्ष पतसंस्थेचा संयुक्त उपक्रम

वाई : ललित कलांचा आविष्कार, संगीताबरोबरच हास्यकल्लोळ, विविध स्पर्धांमधून गुणदर्शन, क्रीडानैपुण्य आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उपक्रमांनी परिपूर्ण अशा ‘वाई फेस्टिव्हल’चा प्रारंभ रविवारपासून (दि. १४) होत आहे. रोटरी क्लब आणि उत्कर्ष पतसंस्थेतर्फे संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.या महोत्सवांतर्गत शुक्रवारी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता महागणपती घाटावरून सायकल रॅलीस प्रारंभ होणार असून, शहीद जवानांना अभिवादन म्हणून ही रॅली होणार आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी दहा वाजल्यापासून गोविंद रामेश्वर मंगल कार्यालयात महिला बचत गटांचे स्टॉल विक्रीसाठी खुले होणार असून, वाईकरांना अनेक उपयुक्त वस्तू वाजवी दरात येथे उपलब्ध होणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता ‘देश मेरा रंगीला’ या नृत्याच्या आणि संगीताच्या कार्यक्रमाद्वारे फेस्टिव्हलचे औपचारिक उद््घाटन होणार आहे. रविवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता काशीविश्वेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून, तेथेच अकरा वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत महागणपती घाटावर दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांचा ‘हास्य षट्कार’ कार्यक्रम होणार असून, रात्री साडेआठ ते साडेबारा या वेळात एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहेत. खुल्या गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित आहेत.सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहा वाजता महागणपती घाटावर समूहनृत्य स्पर्धा होणार आहेत. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सात वाजता महागणपती घाटावर ‘उत्कर्ष श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धांसाठी उत्कर्ष पतसंस्थेच्या गणपती आळी येथील कार्यालयात नावनोंदणी करायची आहे. वाईकरांनी हजारोंच्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वाई फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुनील शिंदे, निमंत्रक आनंद कोल्हापुरे, सचिव मदनकुमार साळवेकर, रोटरी क्लब वाईच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, सचिव डॉ. नितीन कदम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)