शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार सांबरे येथे शुक्रवारी भूमिपूजन : एक हजार टन गॅस निर्मिती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार आहेत. गवतापासून गॅस निर्मिताचा देशातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार आहेत. गवतापासून गॅस निर्मिताचा देशातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरीजवळील सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे होत आहे. त्याचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी अक्षयतृतीयेला होणार आहे. शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये टन या दराने हत्ती गवत खरेदी करून त्यापासून प्रतिदिन एक हजार टन गॅस निर्मिती करण्याचे नियोजन आहे. कोविड स्थिती आटोक्यात आली तर दि‌वाळीपासून अन्यथा २६ जानेवारी २०२२पासून कोणत्याही स्थितीत गॅस उत्पादन सुरु करण्याचे प्रयत्न आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रकल्प येथे प्रत्यक्षात आकार घेणार आहे.

मुंबईच्या मीरा क्लिन फ्युएल्स (एमसीएल) या मुख्य कंपनीतर्फे प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गडहिंग्लज फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येईल. त्यामार्फत गवत उत्पादन होईल. व्हेंचुरिक एनर्जी प्रा. कंपनीतर्फे प्रत्यक्ष गॅस उत्पादन करण्यात येईल. ग्रामीण भागात शेतकरी आता जनावरांचा ओला चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर हत्ती गवताचे उत्पादन घेत आहेत. त्यातील ‘सुपर नेपिअर’ म्हणून विकसित वाण यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचे बियाणे कंपनी पुरवणार आहे. या पिकाला फारसे कष्ट लागत नाहीत, खतेही फार लागत नाहीत. जमीन हलक्या प्रतीची असेल तरी चालते. अडीच महिन्यात एकरी ४० टन गवताचे उत्पादन होते. वर्षात ५ कंपन्या होतात. कंपनी एक हजार रुपये टन या दराने ते शेतकऱ्यांकडून विकत घेईल. वार्षिक १५० टन उत्पादन अपेक्षित धरले तरी दीड लाख रुपये शेतकऱ्याला मिळतील.

तालुकास्तरावर अडीच हजार रोजगार

प्रत्यक्ष कारखान्यात दीड हजार आणि फिल्डवर एक हजार कर्मचारी या तालुकास्तरावरील प्रकल्पासाठी लागणार आहेत. त्यामुळे एका तालुक्यातील अडीच हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.

८८ गॅस पंप

महाराष्ट्रात आता ८८ सीएनजी गॅस पंप मंजूर झाले आहेत. त्यांना या प्रकल्पातून गॅस पुरवठा करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सीएनजी, पीएनजी व बायो फर्टिलायझर अशी उत्पादने घेतली जाणार आहेत.

सध्या भारत दैनंदिन इंधन ८२ टक्के आयात करतो. त्यामध्ये ४० टक्के एलपीजी गॅस असतो. या प्रकल्पामध्ये आम्ही शेतकऱ्यालाच गॅस उत्पादन करायला शिकवणार आहोत. पर्यावरण रक्षण, कॅन्सरमुक्त शेतीकडे नेणारा व इंधनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवणारा हा प्रकल्प आहे.

- सुधीर फडके

मुख्य प्रवर्तक

व्हेंचुरिक एनर्जी प्रा. लिमिटेड

फोटो : ०८०५२०२१-कोल-गॅस प्रोजेक्ट (पीडीएफ आहे)