शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

अतिक्रमणांवर ‘घाव’

By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST

महापालिकेची कारवाई : तावडे हॉटेल परिसरातील अवैध मिळकती जमीनदोस्त

 कोल्हापूर : मोठा पोलीस फौजफाटा, सात डंपर, चार जेसीबी मशीन, दोन बुम, पाच ब्रेकर, दोन गॅस कटर, एक पोकलँड, एक फायर, दोनशेहून अधिक कर्मचार्‍यांचा लवाजमा सकाळी नऊ वाजल्यापासूनच विभागीय कार्यालय क्रमांक - चार येथील ताराराणी चौकात थांबला होता. सव्वादहाच्या सुमारास सर्व पथके राष्टÑीय महामार्गाजवळील तनवाणी हॉटेलजवळ आली. यावेळी सर्वांत प्रथम नवीन सुरू असलेली बांधकामे पाडू, तोपर्यंत इतर व्यापार्‍यांना साहित्य हलविता येईल, अशी मोहीम ठरविण्यात आली. चार जेसीबी मशीनसह चार पथके करून एकाचवेळी कारवाई करण्याची व्यूहरचना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आखली. या योजनेनुसार १० वाजून ४० मिनिटांनी कारवाई सुरू झाली. सर्वांत प्रथम तनवाणी लिकरच्या शेजारील नवीन इमारत पाडण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाने इमारत मालक नानक सुंदराणी यांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यास दूर ढकलत नेले. दरम्यान, नगरसेवक निशिकांत मेथे व रवी इंगवले यांनी जुजबी कारवाई करू नका, एकाच ठिकाणी न थांबता थोडी थोडी प्रत्येक इमारत पाडत चला. तोंडदेखलेपणा केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दमच प्रशासनाला दिला. त्यानंतर कारवाईने वेग घेत पहिल्या दोन-अडीच तासांत सुमारे वीसहून अधिक मिळकतींवर जेसीबी लावत मोठ्या प्रमाणात बांधकामे पाडली. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारती, स्टेशनरीचे दुकान, घरगुती साहित्यांचे दुकान, कापडाची दोन दुकाने, रंगसाहित्याचे दुकान, कटलरी, साहिल फोम अँड फर्निशिंग, पडदे व अंतर्गत सजावटीचे शोरूम, इलेक्ट्रॉनिक्स मॉल, आदी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ही मोहीम सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. उद्या, मंगळवारी सकाळी दहा वाजता पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार असल्याने अतिक्रमित जागेवरील व्यापार्‍यांनी साहित्य हलवून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महापौर सुनीता राऊत व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट दिली. मिळकतधारकांनी महापौरांना निवेदन देऊन कारवाई एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी यावेळी, न्यायालयाचा निर्णय झाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागांवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी) राजू डकरे यांचा हस्तक्षेप माजी नगरसेवक राजू डकरे यांनी अनेक ठिकाणी कारवाई थांबविण्याबाबत हस्तक्षेप केला. त्यांनी आहुजा इलेक्ट्रॉनिक्स शेजारील घर सजावटीच्या दुकानासह इतर मिळकतधारकांवर कारवाई करताना विरोध केला. ‘साहेबांचा निरोप आहे, कारवाई थांबवा’, असे ते अधिकार्‍यांसह नगरसेवकांना सांगत होते. मात्र, नगरसेवकांनी जोर लावल्याने डकरेंनी काढता पाय घेतला. ‘पीए’ची धडपड आहुजा इलेक्ट्रॉनिक्सवरील कारवाई थांबवावी. त्यांना थोडा अवधी देऊया, अशी विनंती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ग्रामीण विभाग जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे यांनी केली. मात्र, रणदिवे यांचे आहुजा यांना वाचविण्याचे प्रयत्न बाद ठरवित प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. रणदिवे यांची कारवाई थांबविण्यासाठी चाललेली धडपड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. महेश जाधव यांचे प्रयत्न कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार महेश जाधव हे सायंकाळी चार वाजता कारवाईच्या ठिकाणी आले. त्यांनी व्यापार्‍यांची बाजू घेत कारवाई थांबविण्याची विनंती प्रशासनास केली. मात्र, प्रशासन कारवाईबाबत ठाम राहिल्याने व्यापार्‍यांना साहित्य काढेपर्यंत वेळ देण्याची विनंती करून जाधव निघून गेले. पंचनामा होणार रस्त्यापासून २४ मीटरची बांधकामे उद्यापासून काढली जाणार आहेत. याची आखणी आज केली. यानंतरची बांधकामे मिळकतधारकाांनी स्वत: काढावयाची आहेत. तसेच इमारतीमध्ये असलेल्या वस्तूंचा पंचनामा करण्यात आला. उद्या सकाळपर्यंत साहित्य न हलविल्यास साहित्यांसह इमारत जमीनदोस्त केली जाणार असल्याची माहिती उपअभियंता एम. एम. निर्मळे यांनी दिली.