शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वशांती पदयात्रा शुक्रवारी सिंधुदुर्गात

By admin | Updated: December 30, 2014 23:33 IST

जिल्ह्यात होणार स्वागत : थायलंडच्या १०० भिक्खू संघांचा सहभाग

खारेपाटण : मुच्छलिंदा इंटरनॅशनल विपश्यना सेंटर बोधगया व संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार ट्रस्ट प्राचीन बुद्ध स्तुप नालासोपारा यांच्या विद्यमाने विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने थायलंड येथील १०० पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिका शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या पदयात्रेचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर मुंबई-गोवा हायवे येथे बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने वैभववाडी बौद्धसेवा व देवगड तालुका बौद्ध सेवा संघ व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या धार्मिक संघटनांच्या सभासद, प्रमुख कार्यकर्त्यांच्यावतीने खारेपाटण हायवेवर या पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मदेसना अर्थात धम्म प्रवचन या विश्वशांती पदयात्रेतील प्रमुख भन्तेजी करणार आहेत. शनिवारी (दि. ३) सकाळी ६ वाजता गोव्याच्या दिशेने ही पदयात्रा पुढे जाण्याकरिता निघणार आहे. तरी या ऐतिहासिक पदयात्रेत सर्व बौद्ध बांधवांनी सहभाग घ्यावा व विश्वशांती पदयात्रेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात यावे, असे आवाहन बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण संघटनेचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)खारेपाटण येथे मुक्कामभगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्राचीन बुद्ध स्तुप नालासोपारा येथून १५ डिसेंबरपासून या पदयात्रेस प्रारंभ झाला असून, ही विश्वशांती पदयात्रा मुंबई-गोवा या महामार्गावरून जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खारेपाटण येथे ही पदयात्रा मुक्कामी येणार आहे.