शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वर्कशॉप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: May 25, 2016 00:32 IST

एम. डी. सावंत यांची बदली : दहा दिवसांत अहवाल देण्याची आयुक्तांची सूचना

चंद्रकांत शेळके, अहमदनगर‘थंडगार पाणीबॉटल, आईस्क्रिम, गरमागरम वडे, चाय, चने-फुटाणे’, अशा आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते. ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग आॅपरेशन करून यावर प्रकाश टाकला. कोणत्याही विक्रेत्याला थेट एसटीत किंवा एसटीजवळ जाऊन खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी नसताना या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले.एसटी प्रशासनाने ज्या काही स्टॉलधारकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी परवाने दिले आहेत, त्यांनी प्लॅटफॉर्म सोडून किंवा एसटीत प्रवेश करून खाद्यपदार्थ विकू नयेत असे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. चालक व वाहकांनी फेरीवाल्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करावा, तसेच असे प्रकार आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या असल्या तरी त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे आढळले. तारकपूर बसस्थानकात पाहणी केली असता फेरीवाले बिनधास्तपणे एसटीत प्रवेश करत होते. एवढेच नव्हे तर प्रवाशांना एसटीत चढ-उतार करण्यास याच विक्रेत्यांमुळे अडथळा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. कोणत्याही बसने स्थानकात प्रवेश केला की ही फेरीवाल्यांची झुंड एसटीवर जणू तुटून पडत होती. काहीजण खिडकीतून, तर काहीजण थेट एसटीत चढून प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत घेण्यास आग्रह करत होते. जोपर्यंत प्रवासी ‘नाही’ म्हणून मान डोलवत नाही, तोपर्यंत कर्णकर्कश आवाजात त्याच्या कानात फेरीवाले ओरडत असल्याचे चित्र होते. बसमध्ये सर्वात आधी प्रवेश करून, चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांना न जुमानता हे फेरीवाले जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत गोंगाट करत असल्याचे आढळून आले. मुद्दामहून लहान मुलांच्या समोर आईस्क्रिम किंवा खाद्यपदार्थ घेऊन घुटमळणे, कपात चहा ओतून थेट प्रवाशांच्या तोंडापर्यंत नेणे, एखादी थंड पाण्याची बाटली खिडकीतून प्रवाशाच्या दिशेने सोडणे असे प्रकार पहायला मिळाले. मळकटलेले कपडे, दिवसभर धुळीत माखलेले तेलकट खाद्यपदार्थ अशा अस्वच्छतेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो, याचे भानही त्यांना नसते. मुळात ज्या स्टॉलधारकाला खाद्यपदार्थ विकण्याचे परवाने आहेत, त्यांनीच ते विकावे, बसस्थानकात दिवसभर धूळ असल्याने खाद्यपदार्थ उघड्यावर विकू नये, शिळे अन्नपदार्थ दुकानात ठेवू नये, असे आदेश असतानाही हेच स्टॉलधारक या फेरीवाल्यांना कमिशनवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियुक्त करतात. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.