शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची उद्या कार्यशाळा

By admin | Updated: June 18, 2015 01:19 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : पुणे विभागातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा सहभाग

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धर्र्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानाचाच भाग म्हणून पुणे विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर व आयुक्त आणि नगरपालिकांचेनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा उद्या, शुक्रवारी होणारआहे. शिवाजी विद्यापीठातील शाहू सभागृहात (सिनेट हॉल) सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विभागाच्या ‘संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजनही यावेळीच करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्णांतील पाच महानगरपालिकांचे महापौर व आयुक्त आणि ४१ नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संकल्प करून होणार आहे. या कार्यशाळेस नगरविकास विभागाच्या सचिव आणि अभियानाच्या नोडल सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, तसेच नगरपालिका प्रशासनाच्या संचालक व आयुक्त मीता राजीव लोचन मार्गदर्शन करणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी माहिती देण्यात येणार आहे. शहरे स्वच्छ व्हावीत, यासाठी कचऱ्याचे संकलन, वर्र्गीकरण आणि विल्हेवाट लावणे, शंभर टक्के शौचालयाचाच वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया, स्वच्छ व हरित महाराष्ट्र साकारणे, व्यापक लोकसहभाग मिळवणे आणि सहभागाचा ठाम निर्धार ही संकल्पना रूजवण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या सप्तपदी स्वच्छतेची ही संकल्पना पुढे आली आहे. (प्रतिनिधी)