शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कार्यकर्तेच विजयाचे ‘शिल्पकार’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यातील चित्र; अखेरच्या टप्प्यात वापरलेली सर्व आयुधेच निर्णायक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात उमेदवारांना नातेवाइकांबरोबर कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली. दहाही मतदारसंघांत कार्यकर्तेच विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय दृष्टिक्षेपात आणण्यासाठी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके व ‘कुंभी’ बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके या दोघांनी मतदारसंघात केलेली बांधणी महत्त्वाची ठरली. चंदगड विधानसभा मतदारसंघात संध्यादेवी यांच्या आमदारकीसाठी स्वर्गीय कुपेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केलेच; पण कन्या डॉ. नंदा बाभूळकर व उदय जोशी यांनी खूप कष्ट घेतले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांच्यासाठी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना उघड प्रचारात येणे अवघड होते. त्यांच्या प्रचाराची धुरा प्रा. जयंत पाटील यांनी खांद्यावर घेतली होती. त्यांच्या जोडीला महाडिकप्रेमी कार्यकर्ते होते. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या प्रचारयंत्रणेवर त्यांनी व नवीद मुश्रीफ यांनी नियंत्रण ठेवले होते. प्रवीणसिंह पाटील, सतीश पाटील, भैया माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शशिकांत खोत यांची भूमिका महत्त्वाची राहिली. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी शिवसैनिकांसह पत्नी वैशाली क्षीरसागर व ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रयत्न केले. इचलकरंजीमध्ये सुरेश हाळवणकर यांचा विजय शहर विकास आघाडीमुळे, तर शिरोळमध्ये शिरोळ बहुजन विकास आघाडीने उल्हास पाटील यांना विजयापर्यंत नेले. ‘गुरुदत्त’चे माधवराव घाटगे, सुरेश पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली. राधानगरीमध्ये युवा वर्गाने प्रकाश आबिटकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. असे ठरले विजयाचे शिल्पकार उमेदवारमतदारसंघ शिल्पकारअमल महाडिकदक्षिणप्रा. जयंत पाटीलराजेश क्षीरसागरउत्तरवैशाली क्षीरसागर व ऋतुराज क्षीरसागरचंद्रदीप नरके करवीरअरुण नरके व अजित नरकेसंध्यादेवी कुपेकरचंदगडनंदा बाभूळकर व उदय जोशीसत्यजित पाटीलशाहूवाडीरणवीरसिंह मानसिंगराव गायकवाडउल्हास पाटील शिरोळ माधवराव घाटगे, सुरेश पाटीलसुरेश हाळवणकरइचलकरंजीशहर विकास आघाडीहसन मुश्रीफकागलदुसऱ्या फळीतील कार्यकर्तेप्रकाश आबिटकरराधानगरीयुवा कार्यकर्तेसुजित मिणचेकरहातकणंगलेसंजय पाटील, महेश चव्हाण,प्रवीण यादव, संजय चौगले