शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना मिळणार ‘आरोग्य सुरक्षा कवच’

By admin | Updated: October 27, 2015 00:22 IST

दिवाळीपूर्वी योजना लागू : कोल्हापुरातील सर्वाधिक कामगारांना मिळणार लाभ

दत्तात्रय पाटील- म्हाकवे -राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कुशल, अकुशल अशा सुमारे दोन लाखांहून अधिक कामगारांसाठी आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना पूर्ववतपणे सुरू करण्यासंबंधी शासन पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत ‘ई’ टेंडर मागविण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी ही योजना कार्यान्वित होणार आहे.शासनाकडे नोंदणीकृत कामगारांसह त्यांच्या कुटंबीयांसाठी ही आरोग्य विमा योजना कवचकुंडले बनली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ५० हजारांहून अधिक कामागारांच्या दृष्टीने ही योजना वरदाई ठरणारी आहे. त्यामुळे कामगार संघटनेच्या पुढाकारातून लाल बावटा बांधकाम संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगारमंत्री, कामगार आयुक्त यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कामगारमंत्री प्रकाश मोहिते यांनी आरोग्य विमा योजनेसह या कामगारांना आणखी लाभदायी योजना लागू करणार असल्याचे सांगितले. १९६६ च्या केंद्र शासनाच्या कायद्याच्या धर्तीवर ६ फेबु्रवारी २००७ मध्ये बांधकाम व्यवसायातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले. यामध्ये गवंडी, प्लंबर, सुतार, फरशी पॉलिश, कटिंगवाले, सेट्रिंग, पेंटर, बिगारी महिला, आदी सर्वच कामगारांचा समावेश करून त्यांची शासन दरबारी नोंदणी करण्यात आली.२०१३ मध्ये राज्यातील कामगार आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी दोन लाखांपर्यंत संबंधित जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्याची मुभा मिळाली. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, प्रसूतीसाठी, महिला कामगारांसाठी अनुदान, अपघाती मृत्युनंतर दोन लाखांचा निधी, घरबांधणीसाठी अनुदान, आदी बाबींच्या तरतुदीही यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार नरसय्या आडम, कोल्हापूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, सचिव शिवाजीराव मगदूम, सीताराम ठोंबरे (नाशिक), भगवानराव घोरपडे (कोल्हापूर), वसंत पोवार (पुणे), अंबालाल मेत्रे (सोलापूर), सिंधुताई शार्दुल (नाशिक), आदींचा समावेश होता. तातडीने कार्यवाही२० आॅगस्टला मुदत संपल्यानंतर नव्यानेच सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने ही योजना बंद केली होती. परंतु, ही योजना कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कितपत गरजेची आहे, याचे महत्त्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारमंत्री मेहता व कामगार आयुक्त एच. के. जावळे यांना पटवून दिले. त्यामुळे कामगार आयुक्त एच. के. जावळे यांनी येत्या आठ दिवसांत ‘ई’ टेंडर मागवून विमा कंपनी निश्चित करून तातडीने ही योजना कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले.कामगारांना दिवाळीला बोनस रूपाने आर्थिक मदत होणार असून, साहित्य खरेदीसाठी दिले जाणारे तीन हजार रुपयांचे अनुदान न मिळालेल्या कामगारांनाही ते देण्यासंदर्भात या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. याच्या पूर्ततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहोत. - शिवाजीराव मगदूम, सिद्धनेर्लीकर, सचिव, लालबावटा जिल्हा संघटना.