शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’ विक्रीला कामगारांचा पाठिंबा

By admin | Updated: August 8, 2015 00:43 IST

हक्क शाबूत ठेवण्याची मागणी : कारखाना विक्री करू नये : रवींद्र पाटील

चंदगड : दौलत कारखान्याच्या विक्रीला किंवा चालवायला येणाऱ्या कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका कामगारांनी घेतली. थकीत कर्जापोटी हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखान्याची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. निविदाही प्रसिद्धीस दिल्या आहेत. या प्रश्नावर विचार करण्यासाठी शुक्रवारी कामगार संघटनेची बैठक हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.हणमंत पाटील यांनी स्वागत करून कामगारांची आजची स्थिती कथन करून ‘दौलत’ची विक्री झाल्यास काय करावे लागेल याबाबत चर्चा करावी, असे आवाहन केले.यावेळी दौलत कारखाना चार हंगाम बंद असल्याने मशिनरी गंजल्या आहेत. काही पार्ट चोरीला गेले आहेत. त्यामुळे या हंगामात ‘दौलत’ सुरू झाला नाही, तर पुन्हा कधीच सुरू होणार नाही. यासाठी कामगारांचे हक्क शाबूत ठेवून मागील देण्याविषयी जी कंपनी चांगला निर्णय घेईल त्याला पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी ‘सिटू’चे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी कामगारांच्या मागील येण्यासंदर्भात जिल्हा बँकेला निवेदन द्यावे लागणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करावी लागणार आहे, असे सांगितले.अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी ‘दौलत’ची वाताहत करण्यात नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांचाच हात आहे. ‘दौलत’ राजकारणाचा अड्डा बनविल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगार आर्थिक अडचणीत आले. शेतकरी भिकेला लागले. त्यामुळे कामगार, शेतकरी यांच्या हितासाठी जर जिल्हा बँकेने योग्य निर्णय घेतल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे सांगितले.यावेळी प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, प्रदीप पवार, केराप्पा पाटील, एस. आर. पाटील, शिवाजी घोळसे, पांडुरंग पाष्टे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.बाबू फगरे, नामदेव कुट्रे, रमेश नाकाडी, गावडू पाटील, नामदेव फाटक, सुरेश सावंत-भोसले, देमाणा पाटील, अनंत पाटील, चंद्रकांत तांबे, मल्लाप्पा केसरकर, धोंडीबा बळजकर, रामचंद्र सांबरेकर, संजय गावडे, मारुती नागुर्डेकर, कॉ. अण्णा शिंदे, विष्णू कडोळकर, राजू पाटील,अर्जुन कुंभार, कामगार उपस्थित होते. कारखाना विक्रीला ‘शेकाप’चा विरोधदरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘दौलत’ विक्रीच्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष गडहिंग्लज जिल्हा न्यायालयात जिल्हा बँकेविरोधात आव्हान देणार असल्याची माहिती ‘शेकाप’चे जिल्हा संघटक रवींद्र पाटील यांनी दिली. ते म्हणाले, २२० कोटी रुपयाला दौलत विक्री केल्यास यामध्ये जिल्हा बँक, एनसीडीसी, सह्याद्री, नवहिंद पतसंस्था व इतर बँका यांचीच कर्जे फेडली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार यांना काहीच मिळणार नाही. बाजारभावाप्रमाणे अंदाजे ५०० कोटींची ‘दौलत’ची मालमत्ता असताना कवडीमोल किमतीला ही मालमत्ता विक्री करायला शेकाप व सभासद संघटना देणार नाही.