शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

'सायझिंग'चे कामगार आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

By admin | Updated: August 14, 2015 00:25 IST

२४ व्या दिवशीही संप कायम : ९६० क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे दाखल

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबत बोलणी करण्यासाठी कोल्हापूरला गेलेले कामगार संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अमित सैनी नसल्याने उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना भेटून माघारी परतले. आता आज, शुक्रवारी पुन्हा हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी गेले २४ दिवस सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात किमान वेतनातील फरक मागणारे ९६० क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे सायझिंग कामगारांनी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे दाखल केले. बुधवारी आणि गुरुवारी असे दोन्ही दिवस १२२९ दावे दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने दावे दाखल होत असल्याने ते भरून घेण्याचे काम राजीव गांधी सांस्कृतिक भवनात सुरू होते.कामगार नेते ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र, जिल्हाधिकारी सैनी हे पुण्याला गेल्यामुळे हे तिघेही निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांना भेटले. त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, जिल्हाधिकारी सैनी यांच्यासमोरच निर्णय घेण्याचे ठरले. सध्या जमावबंदी असल्याने आज, शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना भेटता येणार नाही. म्हणून कामगार प्रतिनिधींनी शुक्रवारी शिष्टमंडळाने येऊन भेटावे, अशी सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)कायदेशीर प्रक्रिया, मग संप का?शासनाने दिलेल्या हक्काप्रमाणे क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया कामगार संघटनेने चालू केली आहे. हे दावे वेगाने चालविण्याचे जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्तांनी मान्यही केले. कायद्याच्या प्रक्रियेत असलेल्या किमान वेतनासाठी आता संप चालू ठेवणे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न आता उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांतून विचारला जात आहे.