शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

कामगारांंना अनुदान मिळेना

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

जुन्या नोंदणीधारक बांधकाम कामगारांत असंतोष : आयुक्त कार्यालयासमोर पावसात रांग

कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी नोंदणी असलेल्या बांंधकाम कामगारांना अनुदान मिळत नसल्याने कमालीचा असंतोष पसरला आहे. कामगार कल्याणकारी मंडळाने केवळ २०१३-१४ मध्ये नोंदणी झालेल्या कामगारांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने जुन्या कामगारांनी आज, शनिवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला; पण याबाबत आदेश नसल्याने काही सांगू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कामगार संतप्त झाले. हे अनुदान घेण्यासाठी आलेल्या कामगारांची पावसातही भली मोठी रांग लागली होती.महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महामंडळातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. त्याबरोबरच कामगारांना ब्लॅँकेट, चादर, मच्छरदाणी, सायकल, जेवणाचा डबा, चटई देण्याची घोषणा कामगारमंत्र्यांनी केली होती; पण या साहित्याऐवजी रोख रक्कम कामगारांना द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यानुसार या कामगारांना तीन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी देण्यात आले आहेत. याचे वाटप सध्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्यरत आहेत. कल्याणकारी मंडळाने केवळ २०१३-१४ या वर्षात नोंदणी झालेल्या कामगारांनाच अनुदानाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी झालेले कामगार अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामुळे कामगारांमधून कमालीचा संताप व्यक्त होत असून, आज काही कामगारांनी सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)