शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांना धमक्या देणाऱ्यांविरोधातील लढ्यास सज्ज रहा

By admin | Updated: April 8, 2017 18:02 IST

अशोक थूल : जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची राज्यकार्यकारिणी

आॅनलाईन लोकमत कोल्हापूर : श्रमिक व कष्टकरी चळवळींना देशद्रोही ठरविण्याचे षड्यंत्र केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. आंदोलन केले तर संघटनांची नोंदणी रद्द करू, तुरुंगात टाकू, अशा धमक्याही दिल्या जात असून, श्रमिकांना धमक्या देणाऱ्या सरकारविरोधातील लढ्यास सज्ज रहा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थूल यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी कोल्हापुरात झाली. यामध्ये थूल यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचे अक्षरश: वाभाडे काढले. केवळ भांडवलदारांचे वर्चस्व कसे राहील अशीच यंत्रणा देशात सुरू असल्याचे सांगत थूल म्हणाले, ज्या अर्थव्यवस्थेत समता नाही तिथे श्रमिकांच्या हक्काचे रक्षण कसे होणार? आज देशभक्ती व विकासाचा अजेंडा घेऊन सरकारच्या वाटचालीतून श्रमिक व कष्टकरी चळवळींना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.सातव्या वेतन आयोगाबाबत नेमलेल्या न्यायमूर्ती माथूर समितीने २२ हजार किमान वेतनाची शिफारस केली होती. पण, या समितीला चार महिन्यांची मुदतवाढ देऊन चक्क अहवालच बदलण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप थूल यांनी केला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला तरीही ते संघर्षाच्या तयारीत आहेत. मग राज्य सरकारी कर्मचारी मागे का? भाजप सरकारच्या कालावधीत अडीच वर्षांत दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोजगार नसल्याने तरुण सैरभैर झाले आहेत, कर्मचाऱ्यांचा एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. सरकारचे धोरण केवळ भांडवलदारांना पूरक असल्याचेही त्यांनी सांगितले. सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, रिक्त पदे भरती, आकृतिबंध, कर्मचारी जॉबचार्ट याविषयी महासंघाची परखड भूमिका कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेश चिलबुले यांनी सांगितली. डी. सी. खाटोळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. महासंघाचे सचिव अजित मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. सुनील काटकर, साताप्पा मोहिते यांच्यासह राज्यातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. जूनमध्ये संपराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जूनमध्ये संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संपाची तारीख नाशिक येथे होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित करणार असल्याचे थूल यांनी सांगितले. असे झाले बैठकीत निर्णय जून महिन्यात प्रस्तावित संप.इतर संघटनांशी मतभेद न करता एकत्रित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न.राजपत्रित संघटनेपेक्षा श्रेणी-३ व ४ यांना बरोबर घेऊन लढा उभा करणे.