शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

वसंतदादा स्मारकाचे काम अखेर मार्गी

By admin | Updated: May 29, 2015 00:02 IST

आजपासून काम सुरू : ३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग; बांधकाम, सजावट होणार

अंजर अथणीकर - सांगली -येथील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम अखेर मार्गी लागले आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असून, यासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये वर्गही करण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षांपासून याचे काम पूर्णपणे थांबले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सांगलीत उचित स्मारक करण्यात यावे, या मागणीवरून स्टेशन चौकात त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते या स्मारकाचे पंधरा वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. या स्मारकाची पायाभरणी झाल्यानंतर गणपती पंचायतनचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन व महापालिकेमध्ये या जागेवरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण नंतर तडजोडीने मिटवण्यात आले. तोपर्यंत स्मारकाच्या खर्चाचा निधी वाढला. यामुळे पुन्हा नव्याने निविदा काढून याचे काम सुरू करण्यात आले. मुळात तीन कोटींचे असणारे काम आता साडेआठ कोटींच्या घरात गेले आहे. आघाडी शासनाने साडेतीन कोटी रुपये मंजूर करूनही तो निधी न आल्याने हे काम गेल्या सात वर्षांपासून रखडले होते. याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या; मात्र काम सुरू झाले नाही. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुरुवारी अधिकाऱ्यांना स्मारकास भेट देण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्मारकास भेट दिली. शुक्रवारपासून स्मारकाभोवती पत्रे उभारण्यात येणार असून, प्रत्यक्षात १ जूनपासून बांधकाम व इतर अंतर्गत सजावटीच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. स्मारकाची दुरवस्था गेल्या सात वर्षांपासून स्मारकाचे काम रखडल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. छताचे पत्रे उचकटले असून, काही पत्रे निखळून पडले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्मारकामध्ये कचऱ्याचा ढीग साचला आहे. पुतळ्याभोवतीही कचरा साचून राहिला आहे. फरशाही उचकटल्या आहेत. शुक्रवारपासून ही जागा बंदिस्त करण्यात येत आहे. आता काय होणार?स्मारकासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहेत. या तीन कोटींमधून अंतर्गत सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये आर्ट गॅलरी उभारणे, फर्निचर, ध्वनियंत्रणा, लँडस्केप, दुरुस्ती, रंगकाम आदी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उर्वरित ४७ लाख रुपयांमधून इलेक्ट्रिकल व्यवस्था करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ज्याने यापूर्वी ठेका घेतला आहे, त्याला हे काम देण्यात आले असून, त्याने नकार दिल्यास नवी निविदा काढून तात्काळ दुसऱ्या ठेकेदाराकडून या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. फेरनिविदेमुळे स्मारकांच्या कामाला पुन्हा विलंब होऊ शकतो. त्यासाठी फेरनिविदेत वेळ जाणार नाही, याची दक्षता घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.