शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेड लाईनचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महापुरानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचीही रेड लाईन व ब्लू लाईन नव्याने निश्चित करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण सुरू ...

कोल्हापूर : महापुरानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचीही रेड लाईन व ब्लू लाईन नव्याने निश्चित करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. हे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण हाेऊन ही लाईन निश्चित केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिली. पूरग्रस्तांना मदत व पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, आजवर फक्त कोल्हापूर शहर व आसपासच्या गावांचा विचार करून रेड लाईन, ब्लू लाईन ठरविण्यात येत होती; पण आता आम्ही जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले यासारखे तालुके, दूधगंगा नदीकाठची गावे अशा गावांचाही यात समावेश केला आहे. नव्या रेड-ब्लू लाईनच्या सर्वेक्षणाचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. हे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण होईल.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पूरग्रस्तांच्या प्रश्नांबाबतचा दावा उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याच्या पहिल्या सुनावणीला प्रधान सचिव उपस्थित होते. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पूरग्रस्त गावे, तालुके, नागरिक, त्यांचे पुनर्वसन याचा सविस्तर आराखडा मागितला असून, त्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. एखाद्या तालुक्यासाठी, गावासाठी काही अभिनव संकल्पना असेल, नागरिक व लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून नवे पर्याय समोर आले असतील, तर त्यांचाही यात समावेश केला जाणार आहे.

----

६८ कोटी हवेत..

पुरात घराचे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी ६८ कोटींच्या निधीची गरज आहे. त्यापैकी १७ कोटी आले. मायनसमधून निधीचे वाटप करण्यात आले; पण ही काही प्रमाणात दिलेली रक्कम आहे. शासनाकडून निधी येईल त्याप्रमाणे वाटप केले जाईल. ज्या पूरग्रस्तांना रेशनचे मोफत धान्य मिळाले नाही, त्यांनी तलाठ्याचे प्रमाणपत्र घेऊन रास्त भाव धान्य दुकानाात जाऊन धान्य घ्यावे, त्यांना अडविले जाणार नाही.

---

पोलिओ डोसप्रमाणे लसीकरण मोहीम

जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. त्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी पल्स पोलिओ डोसप्रमाणे गावागावांत, रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर, गावातील आरोग्य केंद्रावर मोहीम राबवली जाईल. तिसऱ्या लाटेसाठी शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा जास्त प्रमाणात लिक्विड ऑक्सिजनचा साठा, ऑक्सिजन निर्मिती, जंबो सिलिंडरची उपलब्धता आहे.

--

बिलापोटी तीन कोटींचे वितरण

कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा पगार व जेवणाची बिले देण्यासाठी तीन कोटी ६० लाखांचा निधी तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रासाठी जास्त रक्कम लागणार असल्याने येथील बिल देता आलेली नाहीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---