शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा रस्त्याचे काम सुरू

By admin | Updated: May 29, 2016 01:02 IST

आंदोलनाच्या धास्तीचा परिणाम : महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे

कोल्हापूर : फुलेवाडी ते रंकाळा स्टॅँड मार्गावरील रंकाळा तलावासमोरील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम शनिवारी महापालिकेने सुरू केले. ‘भाजप’च्या आंदोलनाचा धसका घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रारंभ करण्याचा नारळ फोडला. तरीही अक्षम्य दिरंगाईच्या निषेधार्थ ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करीत निषेध नोंदविला. रंकाळा तलाव येथे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असणारा रस्ता तातडीने पूर्ण होण्यासाठी भाजपतर्फे अनेकवेळा आंदोलने केली आहेत. फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा स्टॅँड हा रस्ता आय.आर.बी.कंपनीकडून करण्यात येणार होता; परंतु जनरेट्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाची किंमत त्यांना देण्याचे मान्य करून हा प्रश्न निकाली काढला; परंतु त्यानंतर हा साधारण ५०० मीटरचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवर होती; परंतु ती त्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडून, वाहनांच्या वर्दळीने धूळ उडून प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी पक्षातर्फे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. या आंदोलनाची धास्ती घेऊन शनिवारी सकाळी ९ वाजताच या रस्त्यावर खडी, मुरूम टाकून कामाचा शुभारंभ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. तरीही पक्षाने ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करून अक्षम्य दिरंगाईचा निषेध नोंदविला. महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी रस्त्याचे काम आठ दिवसांत पूर्ण झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांना अभियंता एस. के. पाटील यांनी येत्या तीन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सरचिटणीस विजय जाधव, माजी अध्यक्ष महेश जाधव, सुभाष रामुगडे, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, संजय सावंत, श्रीकांत घुंटे, राजू मोरे, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, मधुमती पावणगडकर, अ‍ॅड. अमिता कुलकर्णी, सुनीता सूर्यवंशी, शारदा पाटील, पारस पालिचा, रवींद्र घाटगे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)