शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाणपुलाचे काम बेळगावमध्ये बंद पाडले

By admin | Updated: May 23, 2015 00:22 IST

रेल्वे ओवर ब्रिज करण्यासाठी रेल्वे खात्याने १४ कोटी, तर कर्नाटक सरकारने सहाकोटी असा २० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, प्लॅनप्रमाणे गुडस् शेड रोड ते हेमू कलानी चौकापर्यंत आहे

बेळगाव :शहरातील कपिलेश्वर रोड रेल्वे ओवर ब्रीजचे काम सुरूकरायला गेलेल्या रेल्वे खाते आणि जिल्हा प्रशासनाला स्थानिक लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला असून, शुक्रवारी रेल्वे पुलाचे काम स्थानिकांनी बंद पाडले. यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये जोरदार खडाजंगीझाली बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वर रोड रेल्वे ओवर ब्रिज करण्यासाठी रेल्वे खात्याने १४ कोटी, तर कर्नाटक सरकारने सहाकोटी असा २० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, हा रेल्वे उड्डाणपूल सीडीपी प्लॅनप्रमाणे गुडस् शेड रोड ते हेमू कलानी चौकापर्यंत आहे. याशिवाय जुना पी बी रोड १२० फूट रुंदीचा सीडीपीप्रमाणे असताना स्थानिक माजी लोकप्रतिनिधींच्या संपत्तीला नुकसान होते म्हणून इथे उड्डाण पूल करण्याऐवजी कपिलेश्वर रोडमधून करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात कपिलेश्वर रोड व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली होती.न्यायालयाने स्थानिक लोकांच्या संपत्तीला धक्का न पोचवता रेल्वे ओवर ब्रिजचे काम करा, असा आदेश दिला आहे. कोर्टाने उड्डाणपुलाचे काम करा, असा आदेश दाखवत आज रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने काम सुरू करण्याचा प्रयत्नकेला. मात्र, स्थानिक लोकांनी विरोधकरीत हे काम बंद पाडले. यावेळी स्थानिक लोक आणि पोलीसयांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र, लोकांच्या विरोधापुढे काम बंद करावे लागले. रेल्वे अधिकारी आणि महापालिका कर्मऱ्यांनी कामाची जेसीबीने सुरुवात करताच भांडूर गल्ली, तहसीलदार गल्ली आणि कपिलेश्वर रोडमधील शेकडो महिला, युवक आणि कार्यकर्ते जेसीबीसमोर येऊन झोपले. त्यानंतर तब्बल दोन तास या भागात तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अनुप अगरवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस देखील हजर होते. पोलिसांनी स्थानिक लोकांना समजविण्याचा प्रयत्नकेला. मात्र, लोक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी कोर्टाची पुढील सुनावणी १ जूनला आहे. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्यावर स्थानिक लोकांचा राग कमी झाला.