शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठासाठी दुसऱ्या दिवशीही काम ठप्प

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

खंडपीठाची मागणी : इचलकरंजीत प्रमुख मार्गांवरून रॅली, गारगोटी येथे तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद ठेवत आंदोलन केले. खंडपीठ कृती समितीने आवाहन केल्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामावर वकिलांनी तीन दिवसासाठी बहिष्कार टाकला आहे. इचलकरंजीत रास्ता रोको इचलकरंजी : इचलकरंजी बार असोसिएशनच्या वकीलांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करत सर्किट बेंचची मागणी केली. आज, शुक्रवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात येणार आहे. असोसिएशनने तीन दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अध्यक्ष सुहास मुदगल, पी. जी. लोहार, राजकुमार निर्मळ, विश्वास चुडमुंगे, माधुरी काजवे यांच्यासह सदस्य सहभागी झाले होते. जयसिंगपुरात निदर्शने जयसिंगपूर : सर्किट बेंचच्या मागणीसाठी आज, गुरूवारी येथील बार असोसिएशनच्यावतीने प्रथमवर्ग न्यायालयात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असून यामध्ये सर्व राजकीय पक्ष व सघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. यावेळी कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापन करण्याचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती मोहित शहा यांनी प्रलंबित ठेवून फसवणून केल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज दिवसभर कामकाज ठप्प राहिले. कोल्हापूरचे पाणी दाखवू : प्रकाश आबिटकर गारगोटी : कोल्हापूर खंडपीठप्रश्नी मुंबई उच्च न्यायालय जर कोल्हापूरकरांच्या भावनेशी खेळणार असेल तर त्यांना कोल्हापूरचे पाणी दाखवावेच लागेल, असा इशारा आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिला. गारगोटी येथे खंडपीठप्रश्नी वकिलांच्या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. आज गारगोटी बार असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालयातून मोर्चा काढत तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई यांनी खंडपीठसंदर्भात लढा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, कॉ. दत्ता मोरे, बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील, अ‍ॅड. के. एस. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांची भाषणे झाली. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, विश्वनाथ कुंभार, जि. प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, विश्वनाथ घाटगे, अ‍ॅड. पी. बी. सापळे, अ‍ॅड. संजय भोसले, घनश्याम ठाकूर, संग्रामसिंह कडव, अल्केश कांदळकर, वकील उपस्थित होते.