शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

‘निर्भया’चे काम सुरू

By admin | Updated: August 10, 2016 01:12 IST

आरती नांद्रेकर : पहिल्या टप्प्यात माहिती संकलन

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातर्फे छेडछाडविरोधी निर्माण केलेल्या ‘निर्भया’ पथकाचे काम मंगळवारपासून सुरू झाले. प्रथम छेडछाडीची ठिकाणे निश्चित करणे, पोलिसांना प्रशिक्षण देणे व येणाऱ्या तक्रारींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात ‘निर्भया’ पथकाचे काम सुरू होणार असल्याची माहिती महिला साहाय्य कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांनी मंगळवारी दिली.सोमवारी (दि. ८) पोलिस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भया पोलिस पथका’चा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यात दहा निर्भया पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील चार पोलिस ठाणी, इचलकरंजी (शहर, ग्रामीण), जयसिंगपूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, कागल यांचा समावेश आहे. या पथकात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला कर्मचारी, तीन पुरुष कर्मचारी, एक चालक असे सदस्य असणार आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालये, कॉलेज, शाळा, नोकरी, आस्थापना, चौक, टपरी, गर्दीची ठिकाणी येथे ते टेहळणी करणार आहे. यासाठी पथकाकडे छुपे कॅमेरे असणार आहेत. छेडछाड करणाऱ्यास प्रथम ताब्यात घेऊन त्याची विहित नमुन्यात माहिती व छायाचित्र घेतले जाणार आहे. मुलगा अज्ञान असेल तर त्याच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशन, प्रबोधन केले जाणार आहे. तरुण असेल तर त्याला पालकांसमोर बोलावून प्रथम प्रबोधन केले जाणार आहे. दुसऱ्यांदा दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. विवाहित तरुण असेल तर त्याच्या पत्नीला पोलिस ठाण्याला बोलावून त्याचे कृत्य सांगितले जाणार आहे. याशिवाय पत्नीसमोरच समुपदेशन केले जाणार आहे. स्वत: यात पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत. याठिकाणी करा संपर्क४पथकाशी संपर्कासाठी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक ९५५२३२८३८३, ७२१८०३८५८५ईमेल आयडी - ू१.‘ङ्मस्र@ेंँंस्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्लटिष्ट्वटर आयडी -ँ३३स्र:/३६्र३३ी१.ूङ्मे/ल्ल्र१ुँं८ं_३ीेंफेसबुक आयडी -६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ल्ल्र१ुँं८ं ३ीें‘ङ्म’ँंस्र४१संपर्क नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३