शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

शिवरायांच्या विचारातूनच मालोजीराजेंचे कार्य

By admin | Updated: July 7, 2017 23:20 IST

शिवरायांच्या विचारातूनच मालोजीराजेंचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणाचे राज्य केले. रयतेच्या हिताचे राज्य केले. लोक त्यांना भोसले यांचे नाही तर रयतेचे राज्य म्हणत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच श्रीमंत मालोजीराजेंनी काम केले, म्हणून तेही रयतेचे राजे झाले,’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.फलटण येथे शुक्रवारी सायंकाळी श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाच्या वतीने मानाचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार खासदार शरद पवार यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोइटे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, पंचायत समितीचे सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, सुभाष शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘बारामती तालुक्यातील मालेगाव कारखाना व छत्रपती कारखाना, भवानीनगर या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीत मालोजीराजेंचे मोठे योगदान होते. त्यांनी नेहमी विकासकामाला प्राधान्य दिले. मुंबई द्विभाषिक राज्य होते. तेव्हाही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांचे मोठे योगदान होते. अवघड काळातही यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी साथ दिली. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा अनेक संस्थांनिकांचे वेगवेगळे विचार चालले होते. संस्थान विलीन करण्यास काहीचा विरोध होता. मात्र मालोजीराजेंनी सर्वप्रथम फलटण संस्थान विलीन करून सर्व रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली. त्यांचे राज्य जनतेच्या हिताचे होते. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझा गौरव समजतो.’रामराजे म्हणाले, ‘माझ्या आयुष्यातील आदरस्थानी शरद पवार असून, १९९१ पासून आम्ही राजकारण करतोय. लोकांनी नेहमी आम्हाला साथ दिली, प्रेम दिले हे विसरून चालणार नाही. लोकांप्रमाणेच शरद पवारांनीही दिशा दाखविण्याचे काम केले. आजोबांनी घालून दिलेल्या आदर्शावर आमची वाटचाल सुरू असून, त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचे समाधान वाटते.’ संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रभाकर पवार यांनी आभार मानले. ‘महावितरण’चा धक्काफलटणच्या महावितरणचा नेहमीच्या भोंगळ कारभाराची चुणूक शुक्रवारच्या कार्यक्रमात दिसून आली. खासदार शरद पवार भाषणाला उभे राहताच वीज गायब झाली. यावेळी उपस्थितांनी मोबाईल बॅटरीचा प्रकाश लावला. दोन मिनिटांत पुन्हा वीज आली. मात्र, वीजवितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.सासरवाडीतून सत्कारमी विचार करतोय, बारामतीकरांचा सत्कार फलटणकर करता. मी माळेवाडीला माहेर तर फलटणला सासर समजतो. त्यामुळे एकप्रकारे हा सासरच्या माणसांकडून माहेरच्या लोकांचा केलेला सत्कारच आहे, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली.