शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

यंत्रमाग कामगार शेतीच्या कामावर

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

संपाचा फटका : गेल्या बावीस दिवसांपासून हजारो कामगार बेकार

गणपती कोळी -कुरुंदवाड  इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय गेल्या बावीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेकार झाले असून, हाताला काम मिळविण्यासाठी ग्रामीण भागाकडे वळत असून शेतामध्ये काम आहे का? अशी विचारणा करत शेतीच्या कामाला लागले आहेत. कामगार संपामुळे शहराची तसेच कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, संप न ताणवता लवकर मिटविण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.इचलकरंजी शहराला वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग व्यवसायाला सर्वच पूरक व्यवसाय निर्माण झाल्याने जवळपासच्या खेड्यातूनही मोठ्या प्रमाणात यंत्रमाग झाले आहेत. कामगारांची संख्या वाढल्याने त्यांचे संघटन करून नेतृत्व करणारे नेतेही पुढे आले. प्रारंभी संप हा कामगार आणि मालक यांच्यापुरता मर्यादित राहून दोघांच्यामध्ये चांगले संबंध ठेवून कामगार नेतेही समन्वय चर्चा घडवून संप मिटवत असत. मात्र, अलीकडच्या काळात संपाला राजकीय वलय लागल्याने कामगार-मालक यांच्या हितापेक्षा स्वप्रतिष्ठा वाढल्याने कामगार-मालक यांच्यामध्ये कटुता निर्माण होत आहे.सायझिंगच्या कामगारांना किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून सायझिंग कामगार संपावर आहेत. त्यामुळे बीम तयार होत नसल्याने यंत्रमाग ठप्प झाला आहे. लूम्स, अ‍ॅटोलूम्स, सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग ही सर्व कारखानदारी एकमेकांवर अवलंबून असल्याने यातील एक घटक बंद पडला, की संपूर्ण यंत्रमागांचा खडखडाट थांबतो. या सर्व कारखान्यांतून सुमारे एक लाखापर्यंत कामगार वर्ग आहे. शिवाय कुरुंदवाड, टाकवडे, अब्दुललाट, शिरदवाड, आदी शहरांच्या परिसरातील यंत्रमाग थांबल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मालकाविरुद्ध लढाई असल्याने रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रूपात रक्कम मागू शकत नाही. तसेच उलाढाल ठप्प झाल्याने यंत्रमाग व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आहेत. या व्यवसायातील बहुतांश कामगारवर्ग कर्नाटकासह परराज्यातील आहेत. त्यामुळे अनेक कामगार गावाकडे परतत असले, तरी शिक्षणासाठी मुले असलेल्या कामगारांची गोची झाली आहे. एकूणच संपामुळे कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, मालक आणि कामगारांच्या दोघांच्या हिताचा निर्णय घेऊन व्यवसाय चालू करून हाताला काम देण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.तुटपुंजा पगाररोजचा चरितार्थ व शिक्षणाचा खर्च चालविण्यासाठी वस्त्रोद्योगातील कामगार आता ग्रामीण भागाकडे शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत. शेतीच्या कामाची सवय नसतानाही घरचा चरितार्थ चालविण्यासाठी नाइलाजास्तव काम करणे भाग पडत आहे. मिळणारे तुटपुंजे पगार घेऊन घरी परतत असताना अनेक कामगारांचे डोळे पाणावत आहेत.