शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

रांगड्या कुस्ती निवेदनाचे ‘पावशतक’

By admin | Updated: January 12, 2017 22:10 IST

गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धा : दोनवडेच्या यशवंतअण्णांचा थक्क करणारा प्रवास

प्रकाश पाटील --कोपार्डे १९८०ला यवलूज (ता. पन्हाळा) येथील कुस्ती मैदानात यशवंत पाटील यांनी स्वत: कुस्ती केली आणि आपल्या दोनवडे (ता. करवीर) गावातील कुस्ती मैदानाची जाहिरात वाचण्यास माईक हातात घेतला अन् तेथूनच त्यांच्या कुस्ती मैदानातील निवेदनाचा प्रवास सुरू झाला. गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धेतील कुस्त्यांचे निवेदन त्यांनी केले. ‘हिंदकेसरी’ या चित्रपटातील दारासिंग व पै. हरी पाटील (महे) यांच्यात झालेल्या कुस्तीचे निवेदनही यशवंत पाटील यांनीच केले.मैदानात कुस्ती चालू असताना मल्ल एकमेकांवर कोणत्या डाव-प्रतिडावांचा वापर करतात याची माहिती आपल्या दमदार आवाजात ते सांगतात. अगदी पणजोबांपासून कुस्तीपरंपरा त्यांच्या घराण्यात असल्याचे ते आवर्जून सांगतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वत:ला कुस्तीक्षेत्रात पैलवान म्हणून फार काम करता आले नाही; पण अनेक होतकरू मल्लांना त्यांनी पुढे आणले.आपल्या ‘कुस्ती निवेदक’ म्हणून सुरू झालेल्या प्रवासाची पाने उलगडताना त्यांनी सांगितलेली ही आठवण मोठी रंजक आहे. १९८० मध्ये यवलूज येथील कुस्ती मैदानासाठी यशवंत पाटील गेले होते. तेथे आपल्या गावातील कुस्ती मैदानाची तारीख व जाहिरात वाचण्यासाठी त्यांनी माईक हातात घेतला. नेमके याचवेळी या मैदानात निवेदन करणाऱ्या निवेदकांचा आवाज बसल्याने त्या जाहिरात वाचणाऱ्या मुलाला बोलवा, असे कुस्ती संयोजकांनी सांगितले आणि त्या दिवशी घेतलेला माईक अजूनही त्यांनी खाली ठेवलेला नाही.१९८१ ला जिल्हा तालीम संघाने कुस्ती मैदान आयोजित केले होते. यावेळी कुस्तीतील भीष्माचार्य बाळ गायकवाड यांनी त्यांची विचारपूस करून निवेदन करण्यास सांगितले. त्यावेळी संयोजक गणपतराव आंदळकर यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी यशवंत पाटील यांना जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्यपद बहाल केले. ते आजही कायम आहे.१९८२ला कोल्हापूर येथे ‘महान भारत केसरी’ची लढत दादू चौगले व सादिक पंजाबी यांच्यात झाली. यावेळी त्यांना साईड कॉमेंट्रीची संधी मिळाली होती. या लढतीवेळी बाळ गायकवाड यांनी, ‘यशवंतच्या हातात माईक द्या’, असे सांगितले आणि ‘राम राम मंडळी’ असं त्यांनी म्हणताच मैदानात एकच जल्लोष झाला. हा आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे निवेदक यशवंत पाटील-दोनवडेकर यांनी सांगितले.कुस्तीसम्राट युवराज पाटील व पै. सतपाल यांची ऐतिहासिक कुस्ती झाली. या कुस्तीचे थेट निवेदन आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणार होते. त्यांच्या आवाजातील रांगडेपणा पाहून निवेदन करण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. विष्णू जोशीलकर हे ‘महाराष्ट्र केसरी’ झाले, त्यावेळीही संपूर्ण स्पर्धेचे निवेदन त्यांनीच केले होते.१९९५ला यशवंत पाटील यांना कृष्णा कारखान्याच्या कुस्ती निवेदनासाठी बोलविण्यात आले. उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ झाला व वादाला सुरुवात झाली. त्यांनी निवेदनाला सुरुवात करताच कुस्तीसाठी डोकीफोड करणारी म्हणून प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा शांततेत पार पडली. कुस्ती निवेदनातील या कामाबरोबरच अनेक नवे मल्ल घडविण्याचे कामही त्यांनी केले आहे.