शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

करनूरच्या कुंभार कुटुंबीयांचा कौतुकास्पद पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:58 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न असा अनेकांचा ग्रह आहे. काही अपवाद वगळता अ‍ॅरेंज मॅरेज हे रजिस्टर पद्धतीने होत नाही; पण करनूर (ता. कागल) आणि वाकरे (ता. करवीर) येथील बऱ्यापैकी सधन असलेल्या कुंभार कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत असा विवाह केला आहे. हॉलचे भाडे, सजावट, संगीत, बेंडबाजा, आहेर-माहेर असा सर्व खर्च टाळून ती रक्कम सामाजिक दातृत्वासाठी खर्च करण्याचा आणि त्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याचा कौतुकास्पद पायंडा पाडला.करनूर येथील तानाजी निवृत्ती कुंभार यांचा मुलगा प्रवीण (बी. ई. सिव्हिल) आणि अशोक भिवाजी कुंभार यांची मुलगी पूजा (बी. टेक. फूड टेक्नॉलॉजी) या दोघांचा विवाह बुधवारी (दि. २९) कोल्हापूर येथील रजिस्टर कार्यालयात नोंदणी पद्धतीने झाला. मूळचे कोगनोळी (ता. चिक्कोडी) येथील तानाजी कुंभार हे शेती खरेदीमुळे करनूरकर झाले. प्रगतिशील शेतकरी असलेले कुंभार हे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. आपल्या मुलाचा विवाह रजिस्टर पद्धतीने करून खर्च वाचवायचा व ती रक्कम गरीब घरातील मुलींच्या विवाहासाठी खर्च करायची, असा निर्धार केला होता. पत्नी आक्काताई, व मुले यांनीही मान्यता दिली. मुली पाहताना याची कल्पना ते आधीच देत. वाकरे येथील हे स्थळ जुळले. हे कुटुंबही तसे सधन आहे. पण, केवळ नारळपानाचा विडा एवढ्यावर ठरलं. मुलीचे आजोबा (आईचे वडील) राजाराम कुंभार (रा. कुडित्रे) व आई-वडील यांनाही हा उपक्रम आवडला आणि दीड महिन्यापूर्वी नोंदणी केली.सहा गरीब मुलींच्या नावावर ठेवीथाटामाटाचा, डौलदार पद्धतीचा विवाह टाळल्याने साधारणत: तीन लाख रुपये खर्च वाचला. त्यातील काही रक्कम त्यांनी सहा मुलींच्या नावावर राष्ट्रीयीकृत बॅक आणि एल.आय.सी.मध्ये ठेवली आहे. वयानुसार या रकमा ३५ हजार ते ८0 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच करनूर येथे बोअर मारण्यासाठी दहा हजार रुपये, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी दहा हजार रुपये, तर काही मुलींच्या लग्नांना सढळ हाताने मदत केली आहे. गरीब आणि दोनपेक्षा अधिक मुली ज्या घरात आहेत, अशा ठिकाणी हा खर्च केला आहे.कार्यालयातील कर्मचारीही आनंदले : एरवी ताणतणाव, विरोधाचा दबाव, नातेवाइकांचा अभाव, तक्रारी, साक्षीदारांच्या अनेक तºहा, अशा वातावरणात विवाह नोंदणी करणाºया अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही कुंभार कुटुंबीयांच्या या उपक्रमाने उत्साहित केले. नवरा किंवा नवरी यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. विशेषत: दोन्हींचे माता-पिता सहीसाठी मिळून आले आहेत. असा प्रसंग नोकरी काळात क्वचितच पाहावयास मिळतो. काहीनी तर गेल्या ३0-३५ वर्षांच्या नोकरीच्या काळात पहिलाच असा विवाह पाहिला, अशा भावना येथील कर्मचाºयानी व्यक्त केल्या.