शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘सावित्रीबाई’मध्ये महिलांचे स्वतंत्र रुग्णालय

By admin | Updated: April 12, 2017 01:15 IST

अमल महाडिक : तीन कोटींचा निधी राज्य सरकार देणार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात खास महिलांकरिता शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार असून, त्यास राज्य सरकारने दोन कोटी तर जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी असा तीन कोटींचा निधीही तयार असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी महानगरपालिकेत पत्रकारांशी बोलताना दिली. प्रसूतिपूर्व चाचण्यांपासून प्रसूतिपश्चात उपचारांसह महिलांच्या विविध आजारांवर येथे उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले. आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक-नगरसेविकांसह आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यावेळी बहुतेक सर्वच नगरसेवकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी आणि शहरातील प्रश्न आमदारांसमोरच आयुक्तांकडे मांडले. बैठक संपल्यानंतर आमदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातून व्यवस्थित औषधोपचार होत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यानुसार आपण राज्य सरकारच्या संबंधित मंत्र्यांशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याच सावित्रीबाई फुले रुग्णालयात खास महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे पत्रही मला मिळाले आहे. एक कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झाले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू झाल्यास प्रत्येक वर्षी सरकारकडून अनुदान मिळणार आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजना सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. महापालिकेने स्वनिधीतून ५० लाख रुपयांचा निधी ‘अतिदक्षता विभाग’ सुरू करण्याकरीता राखून ठेवला आहे. ‘अतिदक्षता विभाग’ सुरू झाला की मग ही योजना सुरू करता येईल. त्याचा पाठपुरावा आपण करत असल्याचेही आमदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी शहरातील कचरा उठावाचे नियोजन करण्यात यावे, थेट पाईपलाईन योजनेवर अधिकाऱ्यांची नियुक्त्या कराव्यात, घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करावी, बायोमॅट्रीक यंत्रणेत सुधारणा करण्यात यावी, टर्न टेबल लॅडर वाहन उपलब्ध करून द्यावे, रंकाळा प्रदूषण टाळण्याकरिता उपाययोजना राबवाव्यात, रिंगरोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, पाणीपुरवठ्यातील असमतोल दूर करावा, आदी विविध सूचना यावेळी नगरसेवकांनी केल्या. चर्चेत सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, ईश्वर परमार, अजित ठाणेकर, संतोष गायकवाड, पूजा नाईकनवरे, शेखर कुसाळे, कविता माने, रूपाराणी निकम, अश्विनी बारामते, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, आर. डी. पाटील, अशोक देसाई, आदींनी चर्चेत भाग घेतला.‘पी हळद, हो गोरी’असं होणार नाहीशहरातील प्रश्नांची माहिती करून घेत आहे. आपल्याकडूनही आज अनेक प्रश्न समजले. सर्व प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न नक्कीच राहील; परंतु ‘पी हळद, हो गोरी’ असं होणार नाही. सर्वच ठिकाणी चांगले परिणाम मिळतील असे नाही, म्हणूनच आपण प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आयुक्त अभिजित चौधरी यांनी यावेळी दिली.स्वतंत्र अधिकारी नेमा : महाडिकराज्य सरकारच्या अनेक योजना शहरात राबविता येण्यासारख्या आहेत; परंतु महानगरपालिकेचे अधिकारी अशा योजनांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे योजना असूनही शहराला त्याचा लाभ होत नाही, म्हणून अशा योजना आणण्याकरिता महापालिकेचा एक वरिष्ठ अधिकारी नेमा. हा अधिकारी महापालिका, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून काम करेल. मंत्रालयात आम्ही त्याचा पाठपुरावा करू. लागणारा निधी उपलब्ध करून घेऊ, पण पाठपुराव्याकरिता खास अधिकारी नेमावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली.