शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला भजनी मंडळ करणार मजरे शिरगावला व्यसनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:44 IST

नंदकुमार ढेरे।लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेतली.मजरे शिरगाव हे साधारण १००० लोकवस्तीचे गाव. सहा वर्षांपूर्वी सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. महिला मंडळाच्या अधिपत्याखालीच गावात सार्वजनिक गणेशाची ...

नंदकुमार ढेरे।लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेतली.मजरे शिरगाव हे साधारण १००० लोकवस्तीचे गाव. सहा वर्षांपूर्वी सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. महिला मंडळाच्या अधिपत्याखालीच गावात सार्वजनिक गणेशाची स्थापना केली. स्वच्छता, प्लास्टिक बंदी, व्यसनमुक्ती, महिला आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप, आदी उपक्रम या सुरू आहेत.व्यसनाधिनतेमुळे कुटुंबाची होणारी वाताहात थांबावी म्हणून महिला व पुरुषांनी ज्या ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता त्याच जागी आम्ही तंबाखू सेवन, मद्यपान करणार नाही, गुटखा किंवा अन्य शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ घेऊन ही शपथ न मोडण्याचाही निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.महिलांनी सहभाग घेतल्यास कोणतेही काम पूर्णत्वास जाते. गावच्या विकासात महिलांचा योग्य उपयोग करून घेतल्यास गावचा कायापालट नक्कीच होतो. या मंडळांच्या महिलांनी घेतलेला विकासाचा ध्यास आदर्शवत आहे.सुनील सूर्यवंशी, बाबू सूर्यवंशी, महादेव सूर्यवंशी, राजेंद्र सामंत, विश्राम सासूलकर, गणपती वाके, महेश गावडे, ज्ञागेश्वर कुंदेकर, अनिल वाके, कमल सूर्यवंशी, पद्मा सामंत, पार्वती पाटील, स्नेहा सूर्यवंशी, धोंडूबाई गावडे, सुमन वाके, नीता कुंदेकर, स्वाती सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थांचा या कार्यात सहभाग आहे.