शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महिला स्वातंत्र्यसैनिक तांबट, हविरेंच्याही संघर्षाची नोंद व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:47 IST

शिवाजी चौक सुशोभीकरण : खरा इतिहास जनतेला माहिती होणे गरजेचे

कोल्हापूर : ‘लोकमत’मधील १९ जानेवारी २०१७ चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील लेख वाचला. त्यानंतर २० जानेवारी २०१७ च्या ‘लोकमत’मधील माजी महापौर भिकशेठ पाटील यांची त्यावरील टिप्पणीही वाचली. याबाबत शिवाजी पुतळा सुशोभीकरणाच्या दृष्टीने आमदार राजेश क्षीरसागर यांना समक्ष तारीखवार माहिती मी स्वत: दिली आहे. गव्हर्नर विल्सनचा पुतळा बसविला तो १९२९ मध्ये. या पुतळ्यावर डांबर मारून विद्रूप केला तो १० आॅक्टोबर १९४२ या घटनेस्थापनेच्या दिवशी. या घटनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. (‘लोकमत’मध्ये १९९३ मध्ये त्यास शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आला आहे, तो चुकीचा आहे.)महिला स्वातंत्र्यसैनिक श्रीमती भागीरथीबाई दत्तोबा तांबट (सोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता. तो सध्या ८१ वर्षांचा असून, निशिकांत तांबट असे त्यांचे नाव आहे. सध्या ते राजारामपुरी नवव्या गल्लीत राहतात) व श्रीमती जयाबाई सिदलिंग हविरे या बहाद्दर महिलांनी १० डिसेंबर १९४२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या पुतळ्यावर डांबर, अ‍ॅसिड फेकून तो विद्रूप केला. तो पुतळा नंतर ब्रिटिश प्रशासनाने चार महिने झाकून ठेवला. वर्षभरानंतर शंकरराव दत्तात्रय माने, अहमद शाबाजी मुल्ला यांच्या पुढाकाराने काका देसाई, कुंडल देसाई, शामराव लहू पाटील, नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, माधवराव घाडगे, आबू जाधव यांनी भर पहाटे पुतळ्यावर घणाचे घाव घातले व तो फोडला. यावेळी माधवराव कुलकर्णी व वासुदेव ऊर्फ बाबूराव देशपांडे यांनी गर्दीचे नियंत्रण केले. अखेर १९४३ मध्ये सरकारला हा पुतळा हटवावा लागला. या जागेवर पुन्हा विल्सनचा पुतळा बसविला जाऊ नये म्हणून शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी १३ मे १९४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून करवून घेतला व तिथे बसविला गेला.विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासल्याबद्दल भागीरथी तांबट व जयाबाई हविरे यांना अटक झाली. या गोष्टीला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये न्यायालयास बांगड्यांचा आहेर केल्याबद्दल, न्यायालयाच्या अवमानाबद्दल त्यांना दीड वर्ष शिक्षा ठोठावण्यात आली. राजबंदी कैद्यांची माहिती तत्कालीन सरकारी गॅझेटमध्ये नोंद आहे. तुरुंगातील शिक्षेची प्रमाणपत्रेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आता सुशोभीकरण होत असताना हा देदीप्यमान इतिहास आजच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. म्हणून या महिला स्वातंत्र्यसैनिक, पुतळा फोडणारे स्वातंत्र्यसैनिक व शिवभक्त भालजी पेंढारकर यांची नोंद नव्याने सुशोभीकरण होताना घेतली जाणे आवश्यक आहे. ती घेतली जावी व खरा इतिहास जनतेला माहीत व्हावा, यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे.- शरद तांबट२०१ अ, शिवाजी पेठ, कोल्हापूर(मो : ९४२३८६०८४०)