शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी ‘पद्माराजे’ स्केटिंग ट्रॅक उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:46 IST

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असतानाच, येथे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी पद्माराजे उद्यानात गेले अनेक वर्ष सुरू असलेला स्केटिंग ट्रॅक महिलांनी उखडून संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वातावरण ...

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असतानाच, येथे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी पद्माराजे उद्यानात गेले अनेक वर्ष सुरू असलेला स्केटिंग ट्रॅक महिलांनी उखडून संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याविरोधात पद्माराजे उद्यान परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी याप्रश्नी महापालिका प्रशासनाला नागरिकांनी निवेदन दिले होते. रविवारी पुन्हा या प्रकरणाचा उद्रेक झाला. सायंकाळच्या सुमारास अचानक शिवाजी पेठेतील महिला एकत्र येऊन त्यांनी पहार, सळ्यांच्या सहाय्याने उद्यानातील स्केटिंग ट्रॅकवरीलफरशा उघडून टाकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्याप्रकाराने नागरिकांची तारांबळउडाली.साधारणत: सुमारे अर्धा तास हे ट्रॅक उखडण्याचे काम सुरू होते. हा संपूर्ण ट्रॅक चार ते पाच ठिकाणी उखडून प्रचंड नुकसान केले. उद्यानात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पद्माराजे उद्यानात कोणतेही बांधकाम करू दिले जाणार नाही, उद्यानाचे सांैदर्य जतन करावे. मात्र, जर नागरिकांना डावलून बांधकाम करणाºयांना तीव्र विरोध दर्शविण्यात येईल, असे नागरिकांनी यावेळी सांगितले.एकतर्फी निर्णय नाही : महापालिका प्रशासनगेल्या आठवड्यात मंगळवारी राजे संभाजी तरुण मंडळाच्या सभागृहात एकत्र येऊन कोणत्याही स्थितीत पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यासाठी गुरुवारी (दि.९) नागरिकांनी महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन भूमिका स्पष्ट केली आहे. यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेऊन निर्णय घेण्यात येईल. नागरिकांचा विरोध घेऊन कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिले आहे.

टॅग्स :Strikeसंप