शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करावे...

By admin | Updated: May 5, 2016 00:48 IST

माधवी नाईक : भाजप महिला आघाडीचा सबलीकरण मेळावा उत्साहात

कोल्हापूर : राज्य सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ उठवीत शहरातील महिलांनी एकत्रित होऊन बचतगटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय स्थापन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये महिला सबलीकरण मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महिला प्रदेश सरचिटणीस भारतीताई दिगडे आदी प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण मेळाव्यात अ‍ॅड. माधवी नाईक यांनी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असून कोल्हापूर शहरातील महिलांनी या योजनांची सखोलपणे माहिती घ्यावी तसेच महिलांनी एकत्रित होऊन बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहावे. सरकारमार्फत मुद्रा योजना, घरकुल योजना, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी मोफत गॅस जोडणी आदी योजनांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतली असून या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळवून देण्यासाठी भाजप कोल्हापूर महिला आघाडीने प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती पावनगडकर यांनी केले. यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीमध्ये रजनी क्षीरसागर, अनिता काळे, प्रमोदिनी हार्डिकर (सांगलीकर) यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पाहुण्यांची ओळख सुनीता सूर्यवंशी यांनी करून दिली. प्रभावती इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी केले होते. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष महेश जाधव, नगरसेविका गीता गुरव, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर, अश्विनी बारामते, भाग्यश्री शेटके, मनिषा कुंभार, यांच्यासह भारती जोशी, आकुताई जाधव, प्रभा टिपुगडे, सुलभा मुजुमदार, विजयमाला जाधव, पद्मिनी डोंगरकर, अनिता वैद्य यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.