शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

समानतेसाठी महिला धावणार

By admin | Updated: March 3, 2016 00:23 IST

‘प्लेज फॉर पॅरिटी’ : लोकमत सखी मंच, एक्सप्लोर कोल्हापूरतर्फे वूमनोथॉन

कोल्हापूर : स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृतीसह स्त्रियांच्या आरोग्यासाठी चालणे व धावणे हा उत्तम व्यायाम आहे, असा संदेश देण्यासाठी ‘लोकमत’ सखी मंच व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. ६) सकाळी साडेसहा वाजता मेरी वेदर ग्राउंडपासून वूमनोथॉन रॅली आयोजन करण्यात आले आहे.आजच्या आधुनिक युगात स्त्री सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे; परंतु जागतिक स्तरावरसुद्धा स्त्री-पुरुष समानता अनेक ठिकाणी अजूनही पाहण्यास मिळत नाही. यासाठी यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन ‘प्लेज फॉर पॅरिटी’ अर्थात ‘स्त्री-पुरुष समानतेची शपथ’ ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे. स्त्री व त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान हा सर्व क्षेत्रांमध्ये उंचाविण्यासाठी घेतलेली शपथ म्हणजे ‘प्लेज फॉर पॅरिटी’ होय. स्त्रियांनी यामध्ये जेवढे जमेल तेवढे अंतर चालून अथवा पळून पूर्ण करावयाचे आहे. सर्वांनी या उपक्रमासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘एक्सप्लोर कोल्हापूर’ या संघटनेच्यावतीने लोकांच्यामध्ये सायकलिंगसह व आरोग्याचे महत्त्व रुजविण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक सायकलिंग रॅलीसह ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येते. यासाठी संघटनेचे संस्थापक सिद्धार्थ साळोखे, बिपीन मिरजकर, विक्रम भोसले, नरेंद्र गवळी यांच्या संकल्पनेतून ही संघटना कार्यरत आहे. मेरी वेदरपासून सकाळी सहा वाजता रॅलीस सुरुवात होणार पाच किलोमीटर इतक्या अंतराची धावणे किंवा चालून पुन्हा मेरी वेदर येथेच यांची सांगता होईल. त्यामध्ये सखी मंच सदस्यांसह सर्वांसाठी मोफत प्रवेश असून, या नोंदणी लोकमत कार्यालय, लक्ष्मीपुरी कोंडा ओळ किंवा ँ३३स्र२://स्र’ीॅिीाङ्म१स्रं१्र३८.ङ्मिं३३ील्ल.िूङ्मे यावर करावी. मी या वूमनोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खास मुंबईहून येथे येत आहे. महिलांनी घराबाहेर पडले पाहिजे. त्यांनाही आकांक्षा व भावना आहे. बाहेरच जग त्यांनीही पाहिले पाहिजे. यासाठी मी मुंबईत काम करतेच पण त्यांचसोबत कोल्हापुरातील महिलांना हा संदेश देण्यासाठी मी यामध्ये सहभागी होणार आहे. डॉ. दीपा कदम